कोरोनाची लक्षणे असूनही रिपोर्ट निगेटिव्ह; फ्रान्समधील नव्या स्ट्रेनने खळबळ

france new strain
france new strain

पॅरिस - गेल्या दीड वर्षापासून जगभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाटही आली असून पुन्हा एकदा लॉकडाऊनही केलं जात आहे. ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत नवीन स्ट्रेन सापडल्यानं कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. दरम्यान, फ्रान्समध्ये नवीन स्ट्रेन सापडल्यानं खळबळ उडाली आहे. नाकातून स्वॅब घेतल्यानंतरही हा स्ट्रेन ओळखणं कठीण असल्याचं सांगण्यात येत आहे. फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितलं की, ब्रिटनमध्ये कोरोनाचे 79 रुग्ण आढळले असून यापैकी 8 रुग्णांमध्ये नवीन स्ट्रेन आढळला आहे. मात्र त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. कोरोना चाचणी केल्यानंतर ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे त्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. कोरोनाची लक्षणे असताना रिपोर्ट निगेटिव्ह येण्याचे प्रकार पहिल्यांदा घडलेले नाही.

फिनलँडच्या संशोधकांनी याआधी अशी घोषणा केली होती की, त्यांनी एक स्ट्रेन शोधला आहे. ज्याचं नाव Fin-796H असं असून नाकाद्वारे स्वॅब घेऊनही रिपोर्ट निगेटिह्व येतात. सध्या युरोपात कोरोना वेगाने पसरत असताना सहजा सहजी निदान न होणाऱ्या या नव्या स्ट्रेनमुळे चिंता वाढली आहे. 

कोरोनाची टेस्ट करताना आरटी पीसीआर म्हणजेच नाकातून नमूना घेतला जातो. कोरोना व्हायरसच्या जेनेटिक कोडचा यातून शोध घेता येतो. फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जेनेटिक सिक्वेन्सिंगचा खुलासा झाला आहे. यात ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनच्या स्पाइक प्रोटीनमध्ये अनेकदा म्युटेशन झालं आहे. यामुळे नाकातून स्वॅब घेतल्यानंतरही कोरोना टेस्ट निगेटिव्ह येत आहेत. 

ब्रिटनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी याला दुजोरा देताना म्हटलं की, नवीन स्ट्रेनच्या काही रुग्णांची सध्या उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारांमध्ये चाचणी करण्यात आली मात्र निदान होऊ शकले नाही. याचा अर्थ असा नाही की नवीन स्ट्रेन न ओळखताच फ्रान्स आणि इतर देशांमध्ये पसरत आहे. या दरम्यान, युरोपियन कंपनी नोवाकयट ग्रूपने अशी घोषणा केली आहे की, त्यांची पीसीआर टेस्ट यशस्वीपणे नवीन स्ट्रेन ओळखू शकते. 

जगातील कोरोना रुग्णांची संख्या 12 कोटींवर
जगात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. आतापर्यंत एकूण 12 कोटींहून अधिक रुग्ण आढळले आहेत.  गुरुवारी दिवसभरात 5 लाख 41 हजार नवीन रुग्ण आढळले असून 10 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9 कोटी 86 लाखांहून अधिक आहे. तर 27 लाखांपेक्षा जास्त जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय. सध्या 2 कोटी 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com