ओमिक्रॉनचा वेग चिंता वाढवणारा; महिन्याभरात १०८ देशात दीड लाख रुग्ण

Omicron
OmicronSakal
Summary

एक महिन्याच्या आत ओमिक्रॉन १०८ देशांमध्ये पसरला असून जवळपास त्याचे दीड लाखाहून अधिक रुग्ण जगभरात आढळले आहेत.

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉन (Omicron) हा डेल्टापेक्षा (Delta) जास्त संसर्गजन्य आहे. एक महिन्याच्या आत ओमिक्रॉन १०८ देशांमध्ये पसरला असून जवळपास त्याचे दीड लाखाहून अधिक रुग्ण जगभरात आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) २४ नोव्हेंबरला ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला होता.

ब्रिटनमध्ये (Britain) ५ एप्रिलपर्यंत ०.१० टक्के रुग्ण हे डेल्टामुळे आढळले होते ते मे अखेरपर्यंत ७४ टक्के तर जूनमध्ये ९० टक्के रुग्ण हे डेल्टा व्हेरिअंटमुळे होते. तर ओमिक्रॉनमुळे ब्रिटनमध्ये एक महिन्याच्या आतच कोरोना संसर्गाने रेकॉर्ड ब्रेक केलं आहे. २२ डिसेंबरला ब्रिटनमध्ये १ लाखापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. एका दिवसात ही सर्वाधिक संख्या ठरली.

अमेरिकेत (America) १९ एप्रिलपर्यंत कोरोनाच्या संसर्गात ०.३१ टक्के रुग्ण हे डेल्टा व्हेरिअंटची लागण झालेले होते. जूनपर्यंत हेच प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत पोहोचलं तर जुलैच्या अखेरपर्यंत ९० टक्क्यांहून जास्त रुग्ण डेल्टामुळे वाढले होते. तर ओमिक्रॉनची एन्ट्री होताच अमेरिकेत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या अमेरिकेतील दर चार लोकांमध्ये एकाला ओमिक्रॉन होत असल्याचं दिसून येत आहे.

Omicron
Corona : घरीच उपचार करता येणाऱ्या मोलनुपिराविर टॅब्लेटला अमेरिकेत मंजुरी

भारतात गेल्या वर्षी डिसेंबर अखेरला डेल्टाचे रुग्ण आढळले होते. सुरुवातीच्या महिन्याभरात ०.७३ टक्के रुग्ण आढळले होते. तर गेल्या २२ दिवसात ओमिक्रॉन १७ राज्यात पसरला आहे. आतापर्यंत देशात ३५० हून अधिक ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.

ओमिक्रॉनचा संसर्ग दक्षिण आफ्रिकेतून सुरु झाल्याचं म्हटलं जातं. याच दक्षिण आफ्रिकेत डेल्टामुळे पहिल्यांदा २ टक्के रुग्ण वाढले होते. त्याची संख्या दुसऱ्या महिन्यात ८९ टक्क्यांवर होती. तर आता ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण २४ नोव्हेंबरला आढळल्यानंतर एक महिन्यात ९५ टक्के रुग्णांना कोरोनाची लागण होण्यास ओमिक्रॉन कारणीभूत ठरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com