
Corona : घरीच उपचार करता येणाऱ्या मोलनुपिराविर टॅब्लेटला अमेरिकेत मंजुरी
न्यूयॉर्क : संशोधनांद्वारे कोरोनावर मात करण्यासाठी आता विविध प्रकारची औषधं बाजारात दाखल होत आहेत. Merck & Co या कंपनीच्या मोलनुपिराविर अँटिव्हायरल टॅब्लेटला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे ही टॅब्लेट घरच्या घरीच उपचारांसाठी वापरता येणार आहे. एक दिवसापूर्वीच Pfizer Inc च्या अशाच टॅब्लेटला अमेरिकेत परवानगी देण्यात आली होती. (US authorizes Merck at home antiviral COVID 19 pill)
हेही वाचा: पुण्यात ओमिक्रॉन विषाणूचा धोका वाढला
Ridgeback Biotherapeutics नं मर्कच्या मोलनुपिराविर टॅब्लेटची निर्मिती केली आहे. सुरुवातीला या औषधानं क्लिनिकल ट्रायलमध्ये हायरिस्क रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची आणि मृत्यूची शक्यता ३० टक्क्यानं कमी असल्याचं दिसून आलं होतं.
हेही वाचा: राज्याच्या चिंतेत भर; दिवसभरात ओमिक्रॉनचे २३ नवे रुग्ण!
ज्या रुग्णांना गंभीर आजार आहेत आणि कोरोनाचे सौम्य ते मध्यम लक्षण असलेल्या प्रौढ रुग्णांवर उपचारासाठी तोंडावाटे घेण्यात येणाऱ्या औषधाला या कंपनीनं परवानगी दिली होती. तसेच ज्यांना कोरोनाचे उपचार सहज उपलब्ध होत नाहीत त्यांच्यासाठी ही टॅब्लेट महत्वाची ठरली होती.
Web Title: Us Authorizes Merck Molnupiravir At Home Antiviral Covid 19 Pill
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..