esakal | कोरोना लस पहिल्यांदा कोणाला मिळणार? WHOने दिली माहिती 
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19 vaccine distribution world health organisation guideline

सध्या जगभरातील बऱ्याच कंपन्यांच्या कोरोनावरील लशी अंतिम टप्प्यात आहेत. कोरोनावरील लशी तयार झाल्यावर कोणाला पहिल्यांदा मिळतील हा मोठा प्रश्न होता.

कोरोना लस पहिल्यांदा कोणाला मिळणार? WHOने दिली माहिती 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

जगभरात सध्या कोरोना महामारी मोठ्या प्रमाणात पसरत आहे. रोज जगभरात कोरोनाचे लाखोंनी रुग्ण वाढत आहेत. आताच्या घडीची विचार केला तर, जगात सध्या 2.2 कोटीच्यावर कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनावर सध्या लस नसल्याने हे आकडे वाढतच आहेत. काही दिवसांपूर्वी रशियाने कोरोनावरील आपली लस तयार झाल्याचे जाहीर केले होते. पण, जगभरातून या लसीवर बरेच प्रश्न निर्माण झाले होते.

सध्या जगभरातील बऱ्याच कंपन्यांच्या कोरोनावरील लशी अंतिम टप्प्यात आहेत. कोरोनावरील लशी तयार झाल्यावर कोणाला पहिल्यांदा मिळतील हा मोठा प्रश्न होता. कारण या काळात प्रगत देशांनी लस तयार करत असलेल्या कंपन्यांची लस पहिल्यांदा मिळण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. यात प्रामुख्याने अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांचा सामावेश आहे. असं जर झालं तर, गरीब देशांना खूप अडचणींना तोंड द्यावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे या देशांतील आरोग्य व्यवस्था कमजोर आहेत. जर त्यांना लस लवकर नाही मिळाली तर इथं कोरोनाचा मोठा उद्रेक होऊ शकेल. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठीच आता जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization)यावर एक मार्ग काढला आहे. WHOने एक 'जॉइंट प्रोक्यो रमेंट प्रोग्राम-COVAX'सुरू केला आहे. यामध्ये या लशींच्या डेवलपमेंट, प्रॉडक्शडन आणि डिस्ट्री ब्यूजशन मध्ये प्रत्येक देशाचा वाटा ठरवला जाणार आहे.  WHOने जगातील देशांना 31 ऑगस्टपूर्वी कोवॅक्सचा (COVAX)भाग होण्यासाठी आमंत्रित केले आहे. आतापर्यंत 75 देशांनी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. कोवॅक्सचे उद्दीष्ट म्हणजे कोरोनाची लस बनली की जगातील प्रत्येक देशाला सम प्रमाणात वाटप करण्याचे आहे. ही लस दोन टप्प्यात सहभागी देशांना मिळण्याची तजवीज WHOने केली आहे. 

WHOने दोन दिले दोन पर्याय
पहिला मार्ग म्हणजे  जगातील प्रत्येक देशाच्या लोकसंख्येनुसार ह्या लशीचं वाटप करण्यात यावं आणि दुसरा मार्ग म्हणजे ज्या देशांत लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त कोरोना रुग्ण आहेत, त्यांना पहिल्या प्राधान्याने लशींचं वाटप करावं.

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

लस पहिल्यांदा कुणाला दिली जाईल
WHOचे महासंचालक टेड्रॉस अधानोम घेब्रेयेसस यांनी सांगितल की, अत्यंत धोकादायक काम करत असलेल्या लोकांना सुरक्षित केल्याशिवाय आरोग्य व्यवस्था स्थिर होऊ शकत नाही, यामध्ये डॉक्टर, आरोग्यसेवक आरोग्य कर्मचाऱ्यांचा सामावेश होतो.  टेड्रॉस यांनी पहिल्यांदा आरोग्य कर्मचार्यांधना प्राधान्य मिळायला हवे त्यानंतर 65 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोकांना लस दिली जावी, असं सुचवलं आहे.
 

loading image
go to top