esakal | कोरोना लस लवकरच मिळणार; ब्रिटनने दिली चांगली बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

Covid

कोरोना महामारीचे थैमान थांबले नसताना या विषाणूवर प्रभावी ठरणारी लस केव्हा येईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कोरोना लस लवकरच मिळणार; ब्रिटनने दिली चांगली बातमी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

लंडन- कोरोना महामारीचे थैमान थांबले नसताना या विषाणूवर प्रभावी ठरणारी लस केव्हा येईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जगभरातील वैज्ञानिक कोरोनावरील लस निर्माण करण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्या 100 पेक्षा अधिक उमेदवार कोरोनावर प्रभावी लस निर्माण करण्याच्या कामात गुंतलेत. यातील जवळपास 10 कोविड लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. यातच ब्रिटनमधून एक चांगली बातमी मिळाली आहे. कोविड लस तीन महिन्यात उपलब्घ होईल, असं सांगण्यात आलं आहे. 

सुशांतची हत्या नव्हे तर आत्महत्याच, एम्सने CBI कडे पाठवला अहवाल

कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कोविड लस तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात वापरासाठी उपलब्ध करुन देण्यात येईल, टाईम्सने सरकारी वैज्ञानिकांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. वैज्ञानिक ऑक्सफर्ड लशीवर काम करत आहेत. 2021 सुरुवातीला या लशीला नियामक मंडळाकडून मान्यता मिळेल, अशी माहिती देण्यात आली आहे. 

कोरोना लस अनुमानापेक्षा लवकर मिळेल. तसेच प्रौढ व्यक्तींना सहा महिन्याच्या कालावधीत लशीचा डोस मिळेल असं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड युनिवर्सिटीच्या लशीची निर्मिती प्रगतीपथावर आहे. तसेत लवकरात लवकर लस लोकांना मिळावी यासाठी मान्यता प्रक्रियेला गती देण्यात येत असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. लशीच्या पुरवठ्यासाठी लष्कराची मदत घेतली जाणार आहे. तसेच ऑक्सफर्ड युनिवर्सिटीची लस कोरोना विषाणूवरील यूरोपातील पहिली लस ठरण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, सिरम इन्स्टिट्यूटने अस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत करार केला आहे. त्यानुसार पुण्यात या लशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी 2021 च्या सुरुवातीला कोरोना लस भारतीयांना मिळेल, असं सांगितलं आहे. शिवाय 10 कोटी कोरोना लशीचे डोस भारतीयांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

देशांत सर्वाधिक चांगली कायदा व सुव्यवस्था ही महाराष्ट्रातच

भारतात आतापर्यंत एकूण 7 कोटी 78 लाख 50 हजार 403 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 2 ऑक्टोबरला जवळपास 11 लाख 32 हजार 675 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. देशातील 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाच्या रिकव्हरी रेटमध्ये वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जितके रुग्ण होते त्याहून अधिक रुग्ण गेल्या आठवड्याभरात कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रिकव्हरी झालेल्या रुग्णांची संख्या आहे.  देशातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ही 64 लाख 73 हजार 545 वर पोहोचली आहे.