कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यात 15 हजार जणांवर ट्रायल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 August 2020

जगभरात सध्या 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन सुरू आहे. चीन, अमेरिका, ब्रिटनसह अनेक देश कोरोनाच्या संशोधनाच्या शर्यतीत आहेत.

अबुधाबी - जगभरात सध्या 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन सुरू आहे. चीन, अमेरिका, ब्रिटनसह अनेक देश कोरोनाच्या संशोधनाच्या शर्यतीत आहेत. काहींच्या कोरोना लसींच्या संशोधनात अपयश आलं असलं तरी अनेक वॅक्सिनच्या ट्रायल यशस्वी झाल्या आहेत. चीनमधील वॅक्सिनचे दोन टप्प्यांची चाचणी पार पडली आहेत. आता या वॅक्सिनची चाचणी अंतिम टप्प्यात आहे.

अबुधाबीतील सेंटरमध्ये चीनच्या वॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेतली जात आहे. इथं वॅक्सिनची ट्रायल घेण्यात आली आहे. 15 हजारांहून अधिक लोकांना ही लस टोचण्यात आली आहे. या लसीचा प्रभाव सकारात्मक झाला तर तिसऱ्या टप्प्यातही पास होईल. त्यानंतर संपूर्ण जगासाठी ही लस उपलब्ध होईल.

सध्या ही लस वेगवेगळ्या देशांमधील नागरिकांना दिली जात असून यातून प्रत्येकासाठी उपयोगी पडू शकते का हे तपासलं जाणार आहे. यामध्ये यश आल्यास कोरोनाला आटोक्यात आणणं सहज शक्य होणार आहे. लस सर्व टप्प्यांमधून पास झाल्यानंतर सध्या कोरोनामुळे बिघडलेलं वातावरण पुन्हा लवकर नॉर्मल होईल असा विश्वास संशोधकांना आहे. 

हे वाचा - प्रचंड केस गळती धोकादायक; कोरोनाची नवी लक्षणं

नास डेली नावाच्या युजरने कोरोना लसीच्या अंतिम चाचणीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये कशा पद्धतीने लस टोचली जाते. जिथं हे लसीकरण केलं जात आहे तिथली परिस्थिती, लस टोचून घेणाऱ्यांच्या प्रतिक्रियाही घेतल्या आहेत. लस टोचलेल्यांनी आम्ही छान आहोत आणि घरी जाण्यासाठी उत्सुक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाशी जग मोठ्या प्रमाणावर झुंज देत आहे. याकाळात काहीतरी मदत करता आल्याची भावनाही यातील काहींनी व्यक्त केली.

कोरोनावर अद्याप कोणतीच लस तयार झालेली नाही. सर्व लसींची ट्रायल सुरू आहे त्यामुळे या लसीच्या अंतिम चाचणीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. डॉक्टरांनीही लसीची मानवी चाचणी कशी होते आणि रिझल्ट काय येतो याची उत्सुकता असून आशा आहे की चांगलेच होईल असंही म्हटलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 vaccine third phase trial on 15 thousand volunteer in abudhabi