प्रचंड केस गळती धोकादायक; कोरोनाची नवी लक्षणं

टीम ई-सकाळ
Saturday, 8 August 2020

डॉ. लँबर्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या टीमने 1500 जणांचे सर्वेक्षण केले. हे सर्वजण कोरोनाची लागण होऊन बरे झालेले रुग्ण होते. त्यातून कोरोनाची 98 वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे समोर आली आहेत.

नवी दिल्ली : कोरोनाच्या लसीवर जगभरात संशोधन सुरू आहे. जवळपास 150 प्रकारच्या लसी तयार करण्यात वेगवेगळ्या देशांतील शास्त्रज्ञ दिवस रात्र एक करत आहेत. तर, कोरोनाच्या सध्याच्या पेशंट्स आणि त्यातून बरे झालेले रुग्ण यांच्यावरही मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. अशाच एका संशोधनातून कोरोनाची नवी लक्षणं समोर आली आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अमेरिकेत झालं सर्वेक्षण
अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. जगातील पाच सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये अमेरिकेचा समावेश आहे. त्यातच येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन सुरू आहे. त्यात कोरोनाची आणखी लक्षणं कोणती आहेत, याचाही शोध घेण्यात येत आहे. ज्यामुळे कोरोनाचे निदान लवकर होईल आणि त्यामुळे रुग्णांवर लवकर उपचार करून, त्यांना वाचवता येईल, असा प्रयत्न सुरू आहे.

आणखी वाचा - पुण्यातल्या गणेशोत्सव मंडळांनी घेतला मोठा निर्णय

या संदर्भात अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. नाटालेई लँबर्ट यांनी एका सर्वेक्षणाची माहिती दिली. डॉ. लँबर्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या टीमने 1500 जणांचे सर्वेक्षण केले. हे सर्वजण कोरोनाची लागण होऊन बरे झालेले रुग्ण होते. त्यातून कोरोनाची 98 वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे समोर आली आहेत. सर्वेक्षणातील 26.5 टक्के रुग्णांना शरिरात प्रचंड वेदना होण्याचा त्रास जाणवला आहे. त्याचबरोबर डोळ्यांना अधूक दिसणं, डोळे कोरडे होणं, लक्षात न राहणं, अशा प्रकारची लक्षणं दिसली आहेत. या सर्वेक्षणातील 27 टक्के नागरिकांना केस गळतीचा त्रास सुरुवातीला जाणवला. अनेकांना अचानक केस गळती सुरू झाली आणि त्याची तीव्रताही अधिक होती. दरम्यान अमेरिकेतील सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रवेंशन (सीडीसी) संस्थेने नागरिकांसाठी जाहीर केलेल्या माहितीमध्ये, ताप, खोकला, प्रचंड डोकेदुखी, श्वास घेण्यात अडथळे, जीभेची चव जाणे, वास न येणे, घसा दुखी, उलट्या आणि जुलाब, अशी कोरोनाची लक्षणं असल्याचं सांगितलंय. त्यात आता सर्वेक्षणातील नव्या लक्षणांचीही भर पडलीय. 

आणखी वाचा - आठ दिवसांनी दिसतात कोरोनाची लक्षणे

अशी आहेत नवी लक्षणं?

  • शरिरातील नसांमध्ये प्रचंड वेदना 
  • लक्ष विचलित होणं
  • झोप न लागणं 
  • डोळ्यांना अंधूक-अस्पष्ट दिसणं 
  • मोठ्या प्रमाणावर केस गळणं 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 new symptoms indiana university School of Medicine study