esakal | ब्रिटनमध्ये एस्ट्राझेनेका लसीची लहानग्यांवरील ट्रायल थांबवली; रक्तात गुठळ्यांची तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine trial.

ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने पहिल्यांदाच कोरोना लसीची लहान मुलांवरील चाचणी सुरु केली होती.

ब्रिटनमध्ये एस्ट्राझेनेका लसीची लहानग्यांवरील ट्रायल थांबवली; रक्तात गुठळ्यांची तक्रार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लंडन : ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने पहिल्यांदाच कोरोना लसीची लहान मुलांवरील चाचणी सुरु केली होती. मात्र, आता एस्ट्राझेनेकाची कोविड-19 लस दिल्यानंतर रक्तात गुठळ्या तयार होण्याच्या तक्रारीनंतर या चाचणीला स्थगिती देण्यात आली आहे.  ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाच्या कोविड-19 लसीचा 6 ते 17 वर्षांपर्यंतच्या मुलांवरील परीक्षण थांबवण्यात आलं आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने स्वत: याची माहिती दिली आहे. एस्ट्राझेनेकाची  लस दिल्यानंतर काही लोकांच्या रक्तामध्ये गुठळ्या बनण्याची तक्रार मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबतचा रिपोर्ट दिला आहे. याबाबतची अधिक माहिती आणि संशोधन उपलब्ध झाल्यावरच आता ही चाचणी पुन्हा सुरू करण्यात येईल. 6 ते 17 वर्षांपर्यंतच्या 300 मुलांवर या लशीचं परीक्षण करण्यात येणार होतं.

हेही वाचा - 19 एप्रिलपासून अमेरिकेत 18 वर्षांवरील सगळ्यांना लस; बायडन यांनी घोषणा

ऑक्सफर्डच्या प्रवक्त्यांनी मंगळवारी म्हटलं की, परीक्षणामध्ये सुरक्षिततेच्या कारणांमुळे ही स्थगिती आणलेली नाहीये तर ते ब्रिटनच्या औषध नियामकांकडून दिशानिर्देशनाची वाट पाहत आहेत. ब्रिटन आणि युरोपमध्ये वयस्करांच्या रक्तामध्ये गुठळ्या होण्यामुळे लशीबाबत चिंतेचं वातावरण आहे. याआधी युरोपिय मेडिसिन्स एजन्सीने म्हटलंय की ते युरोपीय देशांमध्ये एस्ट्राझेनेकाच्या लशीची पहिला खुराक घेणाऱ्या रुग्णांमध्ये आढळणाऱ्या त्रासाची तपासणी करत आहेत. ऑस्ट्रीया, एस्टोनिया, लिथुआनिया, लातविया, लक्समबर्ग, डेनमार्क, बुल्गारिया, नॉर्वे, आईसलँड, स्लोवेनिया, साईप्रस, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनसहित अनेक युरोपिय देशांनी एस्ट्राझेनेकाच्या लसीचा वापर स्थगित केला आहे. 

loading image