esakal | 19 एप्रिलपासून अमेरिकेत 18 वर्षांवरील सगळ्यांना लस; बायडन यांनी घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccine US

जो बायडन यांनी म्हटलंय की, 19 एप्रिलपासून 18 वर्षे वयावरील प्रत्येक अमेरिकन नागरिकाला आता कोरोनाची लस घेता येणार आहे. 

19 एप्रिलपासून अमेरिकेत 18 वर्षांवरील सगळ्यांना लस; बायडन यांनी घोषणा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन : जगभरात सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अजूनही कोरोनाबाबतची संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आली नाहीये. जगभरात अनेक लशींना मान्यता मिळाली आहे. अनेक देशांमध्ये लशीकरणाची मोहिम देखील मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी काल मंगळवारी केली आहे. त्यांनी म्हटलंय की, 19 एप्रिलपासून 18 वर्षे वयावरील प्रत्येक अमेरिकन नागरिकाला आता कोरोनाची लस घेता येणार आहे. 

याआधी लसीकरणाच्या तारखेबाबत वेगळा निर्णय घेतला गेला होता. अमेरिकेमध्ये 1 मेपासून 18 वर्षे वयावरील प्रत्येक नागरिकाला कोरोना लस देण्यात येईल, असा निर्णय घेतला गेला होता. मात्र, काल मंगळवारी हा निर्णय बदलण्यात आला. जो बायडन यांनी हे स्पष्ट केलं की, 1 मे ऐवजी आता 19 एप्रिलपासूनच 18 वर्षे वयारील अमेरिकन नागरिकाला कोरोनाची लस घेता येणार आहे. ही घोषणा करताना जो बायडन यांनी अमेरिकेतील लसीकरण मोहिमेबाबत देखील माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, अमेरिकेने आता 150 दशलक्ष डोस देण्याचा आकडा आता ओलांडला गेला आहे. त्याचबरोबर त्यांनी असं देखील म्हटलं की, राष्ट्राध्यक्ष म्हणून 100 दिवस पूर्ण करायच्या आतच 200 दशलक्ष डोसचा आकडा पार करण्यात येईल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. 150 दशलक्ष डोस देणारा आणि 62 दशलक्ष लोकांचे संपूर्ण लसीकरण करणारा अमेरिका हा पहिलाच देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

हेही वाचा - Corona: दुसऱ्या लाटेने मोडले सगळे रेकॉर्ड्स; एका दिवसांत आढळले तब्बल 1.15 लाख रुग्ण

इंडियन मेडिकल असोसिएशनने आता याबाबतची एक विनंती पंतप्रधान मोदींना केली आहे. मेडिकल असोशिएशनने मोदींना पत्र लिहून म्हटलंय की, देशातील 18 वर्षे वयावरील सर्व नागरिकांना लस घेण्याची मुभा देण्यात यावी. कोरोना लसीकरणाची मोहीमेमध्ये 18 वर्षे वयावरील नागरिकांना लस घेण्याची परवानगी तातडीने देण्यात यावी अशी मागणी या पत्रामध्ये करण्यात आली आहे. याआधी काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील लसीकरणातील कडक निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली आहे. लसीकरण केंद्र सुरु करण्यामध्ये अनेक अटी आणि शर्थी असून त्या आता दूर करण्यात याव्यात आणि लसीकरणाच्या प्रक्रियेस आणखी गती देण्यात यावी, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काल पंतप्रधान मोदींना पत्र लिहून 25 वर्षे वयावरील सर्वांना लस घेण्यास परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली आहे.

loading image