एकदा कोरोना झाल्यास पुन्हा कधीपर्यंत तो तुम्हाला होणार नाही? वैज्ञानिकांचा मोठा खुलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 2 September 2020

एखादा व्यक्ती कोरोनातून बरा झाल्यास त्याच्या शरीरात किती काळापर्यंत अँटिबॉडी (प्रतिकारशक्ती) टिकून राहतात याबाबत वैज्ञानिकांनी मोठा खुलासा केला आहे.

नवी दिल्ली- जगभरात कोरोना महामारीचा प्रकोप वाढत आहे. अशात एखादा व्यक्ती कोरोनातून बरा झाल्यास त्याच्या शरीरात किती काळापर्यंत अँटिबॉडी (प्रतिकारशक्ती) टिकून राहतात याबाबत वैज्ञानिकांनी मोठा खुलासा केला आहे. कोरोनाची बाधा होऊन, नंतर बरे झालेल्यांमध्ये ४ महिन्यांपर्यंत शरीरात अँटिबॉडी टिकून असतात, असा दावा वैज्ञानीकांनी केला आहे. यासंदर्भातील संशोधन मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

आता तुम्ही कुठेही, कधीही धावू शकता, पंतप्रधान मोदींनी सुरू केली ही चळवळ

वैज्ञानिकांनी आईसलँडमधील कोरोनामुक्त झालेल्या काही लोकांवर परिक्षण केले. त्यातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांच्या शरीरामध्ये अँटिबॉडी चार महिन्यापर्यंत टिकून असल्याचं दिसून आले. त्यानंतर त्यांच्या शरीरातील अँटिबॉडी नष्ट झाल्या आहेत. मागील काही अभ्यासांमध्ये, शरीरातील अँटिबॉडी काही महिन्यातच नष्ट होत असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे अँटिबॉडी किती काळासाठी राहतात किंवा कोरोनातून बरे झाल्यानंतर किती काळासाठी हा आजार आपल्याला होणार नाही याबाबतचे प्रश्न कायम होते.

आईसलँडमधील वैज्ञानिकांनी या संशोधणासाठी ३०,००० लोकांच्या शरीरातील अँटिबॉडीची पातळी मोजली. कोरोनाची लागण झाल्यानंतर दोन महिन्यांसाठी शरीरातील अँटिबॉडी वाढत जातात आणि पुढील दोन महिन्यांपर्यंत त्या स्थिर राहत असल्याचं संशोधणात सांगण्यात आलं आहे.  'द न्यू इंग्लड जर्नल ऑफ मेडिसिन'मध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे संशोधन केवळ एकाच देशातील एकसंध लोकसंख्येवर करण्यात आले आहे. त्यामुळे जगातील विविध देशातील लोकसंख्येबाबत वेगळे निकाल दिसून येऊ शकतात, असंही वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात कोरोनाकाळात वाढलं गुन्ह्यांचं प्रमाण; जाणून घ्या आकडेवारी

दरम्यान, वैज्ञानिकांच्या या संशोधनामुळे मोठी मदत मिळू शकणार आहे. एकदा कोरोना होऊन गेला असल्यास पुन्हा तो होतो का? किंवा पुन्हा किती काळानंतर तो होण्याची शक्यता आहे, असे प्रश्न अनेकांना सतावत आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची काही प्रकरणे समोर येत होती. त्यामुळे वैज्ञानिकांच्या या संशोधनामुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नवी दिशा मिळू शकणार आहे. शिवाय केवळ कोरोनाची चाचणी करण्यापेक्षा एखाद्याच्या शरिरातील अँटिबॉडी तपासण्याचा किफायतशीर पर्यायही आपण अवलंबवू शकतो.

(edited by- kartik pujari)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: COVID Antibodies Present In Patients After Recovery said Study

Tags
टॉपिकस
Topic Tags: