esakal | मास्क नसल्यास अटकेचा आदेश काढणारे अध्यक्षच मास्कविना
sakal

बोलून बातमी शोधा

rodrigo duterte

मास्क नसल्यास अटकेचा आदेश काढणारे अध्यक्षच मास्कविना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मनिला- मास्क योग्य पद्धतीने न घालणाऱ्या व्यक्तींना अटक करा असा आदेश फिलिपिन्सचे (Philippine ) अध्यक्ष रॉड्रीगो ड्युटेर्टे (rodrigo duterte) यांनी पोलिसांना दिला आहे. त्यांनी कोविड टास्क फोर्सची बैठक घेतली. त्यावेळी ते सोडून इतर सर्वांनी मास्क घातल्याचे चित्रफितीमध्ये दिसून आले.बैठकीनंतर ड्युटेर्टे यांनी सांगितले की, कोरोना निर्बंध मोडणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर बनावे. नाकाखाली मास्क असल्यास त्याला अटक करावी. तो मास्क नीट का घालत नाही याची चौकशी करावी. हे माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी आहे. तुम्हाला संसर्ग होऊ नये आणि तुमच्यामुळे संसर्ग होऊ नये हे देशाच्या हिताचे आहे.

मार्चच्या अखेरपासून राजधानी मनिला आणि आसपासच्या प्रांतांमध्ये संसर्ग वाढल्यामुळे निर्बंध कडक करण्यात आले. ते मोडणाऱ्या हजारो नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. ड्युटेर्टे यांचे प्रवक्ते हॅरी रोक्यू यांनी असा आदेश जारी करण्यात आल्याचे सांगितले. त्यानुसार दोषी व्यक्तीवर कोणताही आरोप न ठेवता त्याला १२ तास डांबून ठेवले जाईल.

हेही वाचा: तालिबान दहशतवादी लोकांना पाण्यासाठी तरसवणार

मागील वर्षी वाद

गेल्या वर्षी लॉकडाउन मोडणाऱ्यास आणि समस्या निर्माण करणाऱ्यास गोळ्या घालाव्यात असा आदेश ड्युटेर्टे यांनी दिला होता. त्यावेळी मानवी हक्क संघटनांनी त्यांच्यावर टीका केली होती.या आदेशावरही करापातान या संघटनेने टीका केली. हा आदेश विचित्र, अशास्त्रीय आणि परिणामशून्य तसेच बळाचा अयोग्य वापर करणारा आहे, असे मत व्यक्त करण्यात आले. याशिवाय देशातील तुरुंगामध्ये आधीच क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. तेथील परिस्थिती अमानवी आहे. त्यामुळे कैद्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अशावेळी मास्क न घालणाऱ्या शेकडो व्यक्तींना तेथे डांबल्यास सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमाचा बोजवारा उडेल. त्यातून संसर्ग जास्त वेगाने पसरेल, असेही नमूद करण्यात आले.

loading image
go to top