esakal | थायलंडच्या पंतप्रधानांना मास्क न घातल्याने दंड

बोलून बातमी शोधा

thailand

थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चॅन-ओचा यांना मास्क न घातल्याबद्दल दंड करण्यात आला. सहा हजार बाह्त (१९० डॉलर) इतकी दंडाची रक्कम आहे. बँकॉकचे गव्हर्नर अस्विन क्वानमुआंग यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजद्वारे ही माहिती दिली

थायलंडच्या पंतप्रधानांना मास्क न घातल्याने दंड
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बँकॉक- थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चॅन-ओचा यांना मास्क न घातल्याबद्दल दंड करण्यात आला. सहा हजार बाह्त (१९० डॉलर) इतकी दंडाची रक्कम आहे. बँकॉकचे गव्हर्नर अस्विन क्वानमुआंग यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजद्वारे ही माहिती दिली. बैठकीच्यावेळी प्रयुथ यांचे मास्क घातला नसतानाचे छायाचित्र त्यांच्याच फेसबुक पेजवर प्रसिद्ध झाले. नंतर ते काढून टाकण्यात आले, मात्र तोपर्यंत क्वानमुआंग यांनी दखल घेतली होती. हा नियमाचा भंग असल्याचे त्यांना कळविण्यात आले. प्रयुथ यांनी सिटी हॉलमधील निर्बंधांबाबत माहिती घेतली होती, पण त्यांनी पालन केले नाही. त्यामुळे दंड ठोठावण्यात आला.

हेही वाचा: थायलंड : उंदरांवरील चाचणी सकारात्मक, आता टाकले पुढचे पाऊल

जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. संसर्ग फोफावत असताना काही निर्बंधाचे पालन करणे सक्तीचे केले आहे. त्यात मास्क घालणे अत्यावश्यक आहे. याशिवाय वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे महत्त्वाचे आहे. अनेक राज्यांमध्ये मास्क न घातल्यास दंड ठोठावण्यात येत आहे. सर्वसामान्यांपासून ते महत्त्वाच्या व्यक्तींपर्यंत सर्वांना मास्क वापरणे अनिवार्य आहे. अशावेळी काहीजण सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरत नसल्याचे दिसून आले. त्यांना दंड ठोठावण्यात येत आहे.