अमेरिकेत भारतीय गोवऱयांची किंमत पाहून व्हाल थक्क

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

भारतीय गायीच्या शेणापासून तयार झालेल्या गोवऱयांना अमेरिकेत मोठी मागणी आहे. फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनवर गोवऱ्यांची ऑनलाईन विक्री होत असून, पाकिटावर गोवऱयांचा वापर फक्त धार्मिक उद्देशांसाठी करावा खाण्यासाठी नव्हे, असे संदेश लिहिण्यात आला आहे.

न्यूजर्सी: भारतीय गायीच्या शेणापासून तयार झालेल्या गोवऱयांना अमेरिकेत मोठी मागणी आहे. फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनवर गोवऱ्यांची ऑनलाईन विक्री होत असून, पाकिटावर गोवऱयांचा वापर फक्त धार्मिक उद्देशांसाठी करावा खाण्यासाठी नव्हे, असे संदेश लिहिण्यात आला आहे.

न्यूजर्सीमध्ये 2.99 डॉलर म्हणजेच 214 रुपयांना गाईच्या 10 गोवऱ्या विकल्या जात आहे. विशेष म्हणजे यावर मेड इन इंडिया असे लिहिण्यात आले आहे. यावरून भारतीय गोवऱया सातासुद्रापार पोहचल्या आहेत. समर हलार्नकर यांनी ट्विटरवर छायाचित्र व्हायरल केले आहे. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावरून व्हायरल होऊ लागला आहे. प्रतिक्रियांच्या माध्यमातून नेटिझन्स व्यक्त होऊ लागले आहेत.

हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र माणले जाते. वैदिक काळापासून भारतात गायीची पूजा केली आहे. शिवाय, गोमुत्र व शेणालाही महत्व आहे. गायीच्या शेणाचा वापर आरोग्यासाठी केला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाचा बाजार तेजीत आला आहे. त्यामुळे गायीच्या शेणाची ऑनलाईक विक्री होऊ लागली आहे. धार्मिक विधींसाठी, परसबागेतील शेतीसाठी, डास पळवून लावण्यासाठी गायीच्या शेणापासून बनविलेल्या गोवऱ्या हे रामबाण साधन आहे. गोवऱ्या खरेदीसाठी कोठेही जाण्याची जाण्याची गरज नाही. ऑनलाइन विश्वात फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनवरून गोवऱ्यांची ऑनलाईन विक्री होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cow dung cakes being onlie sold at a grocery at usa