गर्भपाताला कायदेशीर मान्यता देणारे विधेयक या देशात बहुमताने मंजूर

पीटीआय
Thursday, 31 December 2020

गर्भपाताला कायदेशीर मान्यता देणारे विधेयक अर्जेंटिनाच्या सिनेटमध्ये बुधवारी बहुमताने मंजूर करण्यात आले. या अधिकारासाठी अनेक दशके आंदोलन करणाऱ्या महिला चळवळीचा हा विजय असल्याचे मानले जात आहे. मंगळवार (ता.३०) पासून १२ तास सुरू असलेल्या चर्चेनंतर हे विधेयक ३८ विरुद्ध २९ मतांनी मान्य झाले.

ब्युनोस आयर्स (अर्जेंटिना) - गर्भपाताला कायदेशीर मान्यता देणारे विधेयक अर्जेंटिनाच्या सिनेटमध्ये बुधवारी बहुमताने मंजूर करण्यात आले. या अधिकारासाठी अनेक दशके आंदोलन करणाऱ्या महिला चळवळीचा हा विजय असल्याचे मानले जात आहे. मंगळवार (ता.३०) पासून १२ तास सुरू असलेल्या चर्चेनंतर हे विधेयक ३८ विरुद्ध २९ मतांनी मान्य झाले.  

या नव्या कायद्यामुळे १४ आठवड्यांचा गर्भपात करण्यास अधिकृत परवानगी मिळाली आहे. बलात्काराच्या घटना आणि गर्भवतीच्या प्रकृतीला धोका असल्यास १४ आठवड्यानंतरच्या गर्भपातालाही मान्यता मिळणार आहे. विधेयकाच्या बाजूने ३८ तर विरोधात २९ मते मिळाली. एक सदस्य अनुपस्थित होता. या विधेयकाला अर्जेटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नन्डिझ यांचे समर्थन ‘चेंबर ऑफ डेप्युटीज’ या कनिष्ठ सभागृहात ते आधीच मंजूर झाले होते. त्यानंतर सिनेटमध्ये मंजुरीचा अडथळाही आता दूर झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गर्भपाताला मंजुरी देण्यासाठी महिला संघटना अनेक दशकांपासून लढा देत होत्या. अशा या विधेयकावर सिनेटमध्ये कालपासून १२ तास एवढी प्रदीर्घ चर्चा झाली. अखेर आज सकाळी त्यावर शिक्कामोर्तब झाले. होता.

येमेनमध्ये गृहयुद्धाचा भडका; पंतप्रधान, मंत्री उतरलेल्या विमानतळावरच स्फोट; 13 जणांचा मृत्यू

लॅटिन अमेरिकेत परिवर्तनाला बळ
पोप फ्रान्‍सिस यांचा मूळ कॅथॉलिक देश अर्जेंटिनात गर्भपाताला अनेकांचा विरोध आहे. पण अध्यक्ष अल्बर्टो फर्नन्डिझ  यांचा पक्ष गर्भपाताला परवानगी देण्याच्या बाजूने होता. आता या नव्या कायद्याबरोबत कट्टर धार्मिक व रुढीवादी असेलल्या लॅटिन अमेरिकेत परिवर्तनाचे वारे वाहू लागेल, अशी आशा व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रदेशात केवळ क्युबा, उरुग्वे आणि मेक्सिकोच्या काही भागात गर्भपाताला कायद्याने परवानगी आहे.

अमेरिकेतील लसीकरणाबाबत बायडेन यांनी व्यक्त केली चिंता; ट्रम्प यांच्यावर टीका 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bill legalizes abortion passed majority in this country