European Airports: युरोपमधील प्रमुख विमानतळांवर सायबर हल्ल्यामुळे ‘चेक-इन’ व बोर्डिंग प्रणाली ठप्प झाली. अनेक उड्डाणांना विलंब झाला, पण भारतीय विमानसेवांवर परिणाम नाही.
ब्रुसेल्स : युरोपमधील काही प्रमुख विमानतळांवर ‘चेक-इन’ आणि बोर्डिंग प्रणालीवर काल रात्री उशीरा सायबर हल्ला झाला. त्यामुळे अनेक ठिकाणची विमान सेवा ठप्प झाली. परिणामी शेकडो उड्डाणांना उशीर झाला, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.