Cyber Attack: तैवानच्या अध्यक्षीय कार्यालयाच्या वेबसाईटवर सायबर हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Taiwan

Cyber Attack: तैवानच्या अध्यक्षीय कार्यालयाच्या वेबसाईटवर सायबर हल्ला

ताइपे : तैवानच्या अध्यक्षीय कार्यालयाच्या वेबसाइटवर मंगळवारी सायबर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर संकेतस्थळ काही काळासाठी बंद पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

(Cyber Attack on Taiwan Official Website)

या हल्ल्यानंतर वेबसाइट लवकरच परत सुरू करण्यात आली आहे. पण अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या संभाव्य तैवान भेटीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला केल्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा: असा झाला अल जवाहिरीचा खात्मा; CIA अधिकाऱ्यांनी सांगितले सिक्रेट मिशन

अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये गेल्यास अमेरिकेला त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे. तत्पूर्वी नॅन्सी पेलोसी यांची तैवान दौरा रोखण्यासाठी चीनच्या शक्तीप्रदर्शन केल्याचे समोर आल्याचे वृत्त होते. त्यानंतर आता चीनकडून अमेरिकेला उघडपणे इशारा देण्यात आला आहे. या घडामोडीनंतर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: Cyber Attack On Taiwan Official Website Ahead Nancy Pelosi Expected Visit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..