Weight Loss Drugs: वजन कमी करणारी बनावट औषधे विकणाऱ्या 250 वेबसाइट बंद, 'या' संस्थेकडून मोठी कारवाई

Fake Weight Loss Medicines: ही GLP-1 औषधे टाइप 2 मधुमेहासाठी विकसित केली गेली आहेत. तसेच यामुळे भूक कमी आणि पोट अधिक हळू रिकामे होते.
Fake Weight Loss Medicines
Fake Weight Loss MedicinesEsakal

सायबर सिक्युरिटी फर्म ब्रँडशील्डने GLP-1 प्रवर्गातील वजन-कमी करणाऱ्या आणि मधुमेहावरील बनावट औषधे विकणाऱ्या 250 हून अधिक वेबसाइट्स हटवल्या आहेत. अशी माहिती कंपनीचे सीईओ योव केरेन दिल्याचे वृत्तसंस्था रॉयटर्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, ब्रँडशील्डने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी चयापचय स्थितींवर उपचारांसाठी औषधांची विक्री करणाऱ्या 279 फार्मसी वेबसाइट्सवर बंदी घातली होती. त्यापैकी 90% पेक्षा जास्त वेबसाइट्स GLP-1 औषधांशी संबंधित होत्या.

कंपनीचे सीईओ योआन केरेन म्हणाले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विकली जाणारी 6,900 हून अधिक बनावट औषधे हटवण्यात आली आहेत.

यामध्ये भारतातील 992, इंडोनेशियातील 544, चीनमधील 364 आणि ब्राझीलमधील 114 औषधांचा समावेश आहे.

Fake Weight Loss Medicines
Iran Israel War : इराण-इस्राइलच्या युद्धात भारताची प्रतिक्रिया, दोन्ही देशांना काय म्हणाले जयशंकर?

बेल्जियम, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्ससह किमान नऊ देशांमध्ये ओझेम्पिक आणि GLP-1 च्या इतर बनावट औषधांमुळे घातक परिणाम नोंदवले गेले आहेत, या औषधांद्वारे कंपन्या लठ्ठपणा कमी करण्याचा दावा करतात.

GLP-1 म्हणजेच Glucagon-like peptide-1 हा अमिनो ऍसिडवर आधारित पेप्टाइड संप्रेरक आहे, जो विशिष्ट न्यूरॉन्सच्या वतीने मेंदूला संदेश पाठवतो आणि भूक नियंत्रित करतो.

Fake Weight Loss Medicines
Iran-Israel war: दोन देशांमधील युद्ध अन् जगाला टेंशन; जाणून घ्या संघर्षाचा तुमच्यावर काय होणार परिणाम

Novo Nordisk चे Ozempic आणि Wegovy व Eli Lilly चे Mounjaro आणि Zepbound ही GLP-1 औषधे आहेत, जी टाइप 2 मधुमेहासाठी विकसित केली गेली आहेत. तसेच यामुळे भूक कमी आणि पोट अधिक हळू रिकामे होते.

ही औषधे रुग्णांना त्यांचे वजन सरासरी 20% कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे या औषधांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी बनावट औषधांचा सुळसुळाट झाला आहे.

बेल्जियम, ब्रिटन, स्वित्झर्लंड आणि युनायटेड स्टेट्ससह किमान नऊ देशांमध्ये ओझेम्पिक आणि इतर GLP-1 च्या बनावट औषधांमुळे झालेल्या प्रतिकूल परिणामांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com