esakal | काबुलमध्ये शाळेजवळ बॉम्बस्फोट; 30 जण जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

काबुलमध्ये शाळेजवळ बॉम्बस्फोट; 30 जण जागीच ठार

काबुलमध्ये शाळेजवळ बॉम्बस्फोट; 30 जण जागीच ठार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एक मोठा हल्ला झाला आहे. शहराच्या पश्चिम भागातील दश्त-ए-बरची भागात एका शाळेजवळ बॉम्ब स्फोट झाला आहे. या बॉम्ब स्फोटात जवळपास 30 जणांचा मृत्यू झाला आहे. अफगान गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामध्ये जवळपास 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

सध्या अफगानिस्तानातील सुरक्षा दले आणि तालिबान दरम्यान मोठा संघर्ष सुरु आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांच्या मदतीसाठी वायुसेनेचे ऑपरेशन देखील सुरु आहे. तालिबानला तोडीस तोड उत्तर देण्यासाटी गेल्या काही दिवसांपूर्वीच वायुसेनेने गजनी, लोगर, जाबुल, हैरात, फराह, हेलमंद आणि बघलानमध्ये हवाई हल्ले केले होते.