International Students: ‘आयडीपी एज्युकेशन’ने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील आणि कॅनडातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मागणी गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात घटली आहे. अमेरिकेतील कठोर व्हिसा नियम आणि कॅनडाच्या बदललेल्या परिस्थितीमुळे या घटेचा परिणाम झाला आहे.
नवी दिल्ली : ‘अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गेल्या वर्षभरात ४६ टक्क्यांहून अधिक घट झाली असून, कॅनडासाठी हीच टक्केवारी ७५ आहे,’ अशी माहिती ‘आयडीपी एज्युकेशन’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.