esakal | 'Delta variant' बद्दल युरोपला WHOचा सावधानतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

delta

'Delta variant' बद्दल युरोपला WHOचा सावधानतेचा इशारा

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

जिनिव्हा: सध्या युरोपातील अनेक देशांत कोरोनाचे (covid 19 cases in Europe) रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. यामध्ये ब्रिटनमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेने (World Health organisation) युरोपातील देशांना कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबद्दल आणि नवीन व्हेरियंटबद्दल ( covid 19 Delta varient) इशारा दिला आहे. अनेक देशांनी एकदम अनलॉक केल्याने कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.

आरोग्य संघटनेचे डॉ. हॅन्स क्लुगे (Dr. Hans Kluge) यांनी सांगितले की, कोरोनाचा नवीन व्हेरियंट मोठ्या प्रमाणात पसरू शकतो. तसेच डेल्टा नावाच्या नवीन व्हेरियंटवर अनेक लसी प्रभावी नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता वयस्कर खासकरून ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांची काळजी घेतली पाहिजे.

हेही वाचा: तब्बल बारा वर्षांनंतर औरंगाबाद विमानतळाला पाणी मिळालं

जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपचे क्षेत्रिय प्रमुख क्लुगे यांनी सांगितले की, मागील वर्षी सुरवातील कमी वयाच्या नागरिकांत कोरोना पसरला होता. त्यानंतर हळूहळू ज्येष्ठ नागरिकांत कोरोनाचा व्हायरस पसरला होता. त्यानंतर युरोपात कोरोनाने हाहाकार माजवला होता. 2020 च्या उन्हाळ्यात कोरोनाने हजारो मृत्यू झाले होते नंतर लॉकडाउन लावला गेला. यामुळे ही चुक आपल्याला पुन्हा करायची नाही, असंही क्लुगे म्हणाले.

गरज असेल तरच प्रवास करावा. तसेच प्रवाशांनी काळजी घेऊन प्रवास करण्याचा सल्ला दिला क्लुगे यांनी दिला आहे. सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहनही क्लुगे यांनी केले आहे.