esakal | तब्बल बारा वर्षांनंतर औरंगाबाद विमानतळाला पाणी मिळालं
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

तब्बल बारा वर्षांनंतर औरंगाबाद विमानतळाला पाणी मिळालं

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळाला दिर्घ प्रतिक्षेनंतर एमआयडीसीमार्फत पाणी मिळाले. विमानतळावरील एटीएस कॉम्प्लेक्स परिसरात गुरूवारी (ता. दहा) पाणी पुरवठा योजनेचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी पाणी पूजनाचा कार्यक्रम प्रविण कुलकर्णी गुरुजी यांच्या हस्ते झाला. विमानतळ निदेशक डी़. जी. साळवे, सहायक प्रबंधक सुधीर जगदाळे, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे, एमआयडीसीचे निवृत्त उपअभियंता दिलीप परळीकर, उपअभियंता गणेश मोईकर, सहायक अभियंता प्रशांत सरग, व्ही़. ए. बनसोडे, शारदा इन्फोटेकचे निखिल कुलकर्णी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय म्हणवणाऱ्या चिकलठाणा विमानतळाला गेल्या बारा वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. विमानतळाला एक लाख सत्तर हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विमानतळ प्राधिकरणने २००७ पासून २०१९ पर्यंत मनपाकडे सातत्याने पाठपुरावा केला़. मात्र मनपालिकेने विमानतळाला पाणी दिलेच नाही. त्यामुळे विमानतळ निदेशक साळवे यांनी १२ जून २०१९ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला होता.

हेही वाचा: दुर्दैवी! जालन्यात डोहातील पाण्यात बुडून तिघा भावंडांचा मृत्यू

त्यानंतर एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांनी १५ जूलै २०१९ मध्ये या योजनेच्या कार्यान्वयासाठी लागणाऱ्या सर्व अटी, नियम, डीपॉजीट वर्क दोन्ही डिपार्टमेंटच्या वरिष्ठ कार्यालयाकडून घेण्यात येणाऱ्या परवानग्या व २३७.५६ लाख रूपयांचे अंदाजपत्रक दिले, त्याला एमआडीसीने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर ९ ऑक्टोबर २०२० रोजी करार करण्यात आला होता. ही योजना पुर्ण झाल्यानंतर त्याचे उद्घाटन करण्यात आले. यासाठी विशेष परीश्रम घेतलेले सहायक अभियंता प्रशांत सरग, बनसोडे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.