...तर नोटाबंदीची फाईल कचऱ्यात फेकून दिली असती: राहुल

वृत्तसंस्था
रविवार, 11 मार्च 2018

मी जर पंतप्रधान असतो, तर नोटाबंदीच्या निर्णयाची फाईल मी कचऱ्यात फेकून दिली असती. तसेच त्या व्यक्तीलाही दरवाज्याबाहेर हकलून दिले असते. नोटाबंदीच्या निर्णयाबाबत असेच करणे आवश्यक होते.

क्वाललंपूर : नोटाबंदीच्या निर्णयाची फाईल मी पंतप्रधान असतो तर कचऱ्यात फेकून दिली असती, असे वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.

राहुल गांधी सध्या मलेशिया दौऱ्यावर असून, त्याठिकाणी त्यांनी भारतीय नागरिकांशी संवाद साधला. या कार्यक्रमात राहुल गांधींना एका नागरिकाने प्रश्न विचारला की तुम्ही नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी कशी केली असती. यावेळी राहुल गांधी यांनी उत्तर देताना म्हटले, की मी जर पंतप्रधान असतो, तर नोटाबंदीच्या निर्णयाची फाईल मी कचऱ्यात फेकून दिली असती. तसेच त्या व्यक्तीलाही दरवाज्याबाहेर हकलून दिले असते. नोटाबंदीच्या निर्णयाबाबत असेच करणे आवश्यक होते.

काँग्रेसकडून नोटाबंदीच्या निर्णयाला सतत विरोध करण्यात आला. काँग्रेसने नोटाबंदीच्या वर्षपूर्तीवेळी ब्लॅक डे साजरा केला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demonetisation should have been thrown in the dustbin says Rahul Gandhi