esakal | अमेरिका - जॉर्ज फ्लॉइड हत्या प्रकरणी पोलिस दोषी; 75 वर्षांचा तुरुंगवास?

बोलून बातमी शोधा

USA

जॉर्ज फ्लॉइड हत्या प्रकरणी दोषी ठरलेल्या डेरेकला शॉविनला उर्वरित आयुष्य तुरुंगातच काढावं लागेल.

जॉर्ज फ्लॉइड हत्या प्रकरणी पोलिस दोषी
sakal_logo
By
टीम ई सकाळ

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या न्यायालयाने मिनियापोलिसातील माजी पोलिस अधिकारी डेरेक शॉविनला जॉर्ज फ्लॉइड हत्या प्रकरणी दोषी ठरवलं आहे. वॉशिंग्टनच्या हेनेपिन काउंटी न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायाधिशांनी डेरेकला निर्घृण हत्या प्रकरणात दोषी ठरवले असून त्याला लवकरच शिक्षा सुनावली जाऊ शकते. शॉविन विरोधात सेकेंड डिग्री मर्डर, थर्ड-डिग्री मर्डर आणि मैनस्लॉटर असे तीन आरोप होते. यात त्याला सेकंड डिग्री मर्डरसाठी 40 वर्षांची कैद, थर्ड डिग्री मर्डर प्रकरणात 25 वर्षांची कैद तर मॅनस्लॉटर प्रकरणी दहा वर्षांची कैद किंवा 20 हजार डॉलर्सचा दंडाची तरतूद आहे. जॉर्ज फ्लॉइड हत्या प्रकरणी दोषी ठरलेल्या डेरेकला शॉविनला उर्वरित आयुष्य तुरुंगातच काढावं लागेल.

जॉर्ज फ्लॉइ़ड हत्या प्रकरणी डेरेकला शिक्षा सुनावल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यांनी म्हटलं की, न्यायालयाच्या निर्णयाने जॉर्ज परत नाही येऊ शकत. पण आम्हाला माहिती झालं की आपण पुढे काय करू शकतो. मी श्वास घेऊ शकत नाही हे त्याचे शेवटचे शब्द होते. आम्ही हे शब्द मरु देणार नाही. आपल्याला ते ऐकावे लागतील आणि त्यापासून दूर पळू शकत नाही.

हेही वाचा: कट्टरतावादासमोर झुकला पाकिस्तान; फ्रान्सच्या राजदूतांची होणार हकालपट्टी

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइड हत्या प्रकरणी माजी पोलिस अधिकारी डेरेक शॉविन विरोधातील खटला सोमवारी ज्यूरींकडे पाठवण्यात आला होता. गेल्या वर्षी शॉविनकडून फ्लॉइडच्या गळ्यावर गुडघ्याने दाब दिला गेल्यानं श्वास गुदमरून मृत्यू झाला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं. लोकांमध्ये असलेली नाराजी संतापातून व्यक्त होऊ लागल्यानंतर प्रकरण ज्यूरींकडे पाठवण्यात आलं. दिवसभर यावर वाद विवाद झाल्यानंतर फ्लॉइड हत्या प्रकरणी डेरेक शॉविनला दोषी ठरवण्यात आलं.