कट्टरतावादासमोर झुकला पाकिस्तान; फ्रान्सच्या राजदूतांची होणार हकालपट्टी

फ्रान्सच्या राजदूतांची हकालपट्टी करण्याची मागणी करत तेहरीके लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या बंदी असलेल्या कट्टरतावादी संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनासमोर शरणागती पत्करत पाकिस्तान सरकारने राजदूतांच्या हकालपट्टीचा ठराव संसदेत मांडणार असल्याचे जाहीर केले.
IMRAN KHAN
IMRAN KHANFRANC24
Summary

फ्रान्सच्या राजदूतांची हकालपट्टी करण्याची मागणी करत तेहरीके लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या बंदी असलेल्या कट्टरतावादी संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनासमोर शरणागती पत्करत पाकिस्तान सरकारने राजदूतांच्या हकालपट्टीचा ठराव संसदेत मांडणार असल्याचे जाहीर केले.

इस्लामाबाद- फ्रान्सच्या राजदूतांची हकालपट्टी करण्याची मागणी करत तेहरीके लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या बंदी असलेल्या कट्टरतावादी संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनासमोर शरणागती पत्करत पाकिस्तान सरकारने राजदूतांच्या हकालपट्टीचा ठराव संसदेत मांडणार असल्याचे जाहीर केले. एवढेच नाही तर, ‘टीएलपी’ विरोधात दाखल झालेले सर्व गुन्हेही मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

सरकारच्या वरीष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर आणि ‘टीएलपी’बरोबर झालेल्या समझोत्यानुसार, फ्रान्सच्या राजदूतांची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव संसदेत मांडला जाणार आहे. दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत ‘टीएलपी’च्या कार्यकर्त्यांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हेही मागे घेतले जाणार असल्याचे पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री शेख रशीद यांनी सांगितले. पाकिस्तानात सध्या फ्रान्सविरोधी वातावरण असून त्यांच्या राजदूतांची हकालपट्टी करावी, ही ‘टीएलपी’ची प्रमुख मागणी होती. या मागणीसाठी हिंसक आंदोलन सुरु केल्याने त्यांच्यावर गेल्या आठवड्यात बंदी घालण्यात आली होती. या संघटनेच्या नेत्यांबरोबर झालेल्या चर्चेत हकालपट्टीची मागणी मान्य करण्यात आली. या बदल्यात ‘टीएलपी’ने लाहोरसह देशभरात इतरत्र सुरु केलेले धरणे आंदोलन मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे.

IMRAN KHAN
कंगाल पाकिस्तान कर्ज काढून कोरोनाशी लढणार; IMF ची कोट्यवधींची मदत

सोमवारी आंदोलकांविरोधात कारवाई करताना पोलिसांनी बळाचा वापर केल्याने त्यात तीन आंदोलकांचा मृत्यू झाला. यामुळे हिंसक जमावाने ११ पोलिसांना ओलिस ठेवले होते. फ्रान्सच्या राजदूतांची हकालपट्टी हा काही मार्ग नव्हे, असे म्हणणारे पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेनंतर ‘टीएलपी’बरोबर बोलणी करत हकालपट्टी करण्याचा ठराव मांडण्याची तयारी दर्शविली.

मंत्री गेले तुरुंगात भेटीला

‘टीएलपी’चा नेता साद रिझवी याला पोलिसांनी हिंसक आंदोलनप्रकरणी गेल्या आठवड्यात अटक केली आहे. त्यानंतर हिंसाचारात आणखीनच वाढ झाली असून आंदोलन सुरुच आहे. हे आंदोलन थांबावे यासाठी अंतर्गत सुरक्षा मंत्री शेख रशीद यांच्यासह चार मंत्र्यांचे शिष्टमंडळ रिझवी याची मनधरणी करण्यासाठी लाहोर येथील कोट लखपत तुरुंगात गेले. मात्र, आंदोलन मागे घेण्यास त्याने साफ नकार दिला. धरणे आंदोलन मात्र मागे घेतले गेले.

IMRAN KHAN
'एक डोस घ्या अन् कोरोनाला पळवा'; पाकिस्तान बनवणार स्वदेशी लस

फ्रान्सविरोधाचे कारण

प्रेषित महंमद यांचे व्यंग्यचित्र प्रसिद्ध केल्यावरून काही वर्षांपूर्वी वाद झाला होता. तेच व्यंग्यचित्र पुन्हा प्रसिद्ध करण्याच्या नियतकालिकाच्या हक्काचे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी समर्थन केले होते. यावरून अनेक मुस्लिम देशांमध्ये मॅक्रॉन यांचा निषेध करण्यात आला. पाकिस्तानमधील फ्रान्सविरोधी भावनेमागेही हेच कारण आहे. फ्रान्सचा निषेध म्हणून त्यांच्या राजदूतांची हकालपट्टी करावी, यासाठी तेहरीके लब्बैक पाकिस्तान या संघटनेने काही दिवसांपासून हिंसक आंदोलन सुरु केले असून यामध्ये काही पोलिसांचा मृत्यूही झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com