पाकच्या झेंड्याची तालिबानकडून विटंबना; व्हायरल व्हिडिओनंतर तालिबानकडून दखल

पाकच्या झेंड्याची तालिबानकडून विटंबना; व्हायरल व्हिडिओनंतर तालिबानकडून दखल

इस्लामाबाद : पाकिस्तानकडून अफगाणिस्तानला मदत पाठवली जात असताना अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानच्या झेंड्याचा अवमान होत असल्याचे आढळून आले आहे. तोरखम सीमेवर ट्रकवरील पाकिस्तानचा झेंडा तालिबानच्या दहशतवाद्यांनी काढल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे पाकिस्तानमध्ये तालिबानविरोधात संताप व्यक्त केला जात असून कारवाईची मागणी केली जात आहे.

पाकच्या झेंड्याची तालिबानकडून विटंबना; व्हायरल व्हिडिओनंतर तालिबानकडून दखल
ब्रिटनची कोविशील्डला मंजुरी पण भारताच्या लसीकरण सर्टिफिकेटवर शंका

ट्रकवरील पाकिस्तानच्या झेंड्याची विटंबना केल्याच्या घटनेची दखल तालिबानच्या दहशतवाद्यांनी घेतली आहे. यासंदर्भात तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिदने या घटनेबद्दल खंत व्यक्त केली आहे. या प्रकरणात सामील असलेल्या लोकांविरोधात कारवाई केली जाईल, असे मुजाहिदने म्हटले आहे. तालिबानच्या सर्व नेत्यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे मुजाहिदने सांगितले. अन्नधान्य आणि वैद्यकीय साहित्य घेऊन येणाऱ्या ट्रकबरोबर अशा प्रकारचे वर्तन सहन केले जाणार नाही आणि असे प्रकार बंद केले जातील, असेही तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानला त्यादिवशी १७ ट्रक पाठवण्यात आले आणि त्यातून २७८ टन खाद्यान्नाचा पुरवठा केला. यात ६५ टन साखर, तीन टन डाळ, १९० टन पीठ, ११ टन खाद्यतेल, ३१ टन तांदूळ याचा समावेश होता. पाकिस्तानकडून हिवाळ्यात आणखी मदत पाठवली जाणार असून यासंदर्भात अफगाणिस्तानातील पाकिस्तानचे राजदूत मन्सूर खान यांनी ट्विट केले आहे. त्यात म्हटले, की हिवाळ्यात अफगाणिस्तानच्या नागरिकांना ब्लँकेट आणि तंबू पाठवण्यात येतील.

पाकच्या झेंड्याची तालिबानकडून विटंबना; व्हायरल व्हिडिओनंतर तालिबानकडून दखल
भारतातून कोरोना लशींची निर्यात होणार; WHO ने मानले आभार

काय आहे व्हिडिओत

पाकिस्तानविरोधातील असंतोष आता अफगाणिस्तानात धुमसत आहे. तालिबानचे दहशतवादी देखील उघडपणे पाकिस्तानला विरोध करत आहेत. यासंदर्भात व्हायरल झालेल्या व्हिडिओने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून मदत साहित्य घेऊन आलेल्या ट्रकला तोरखम सीमेवर अडवण्यात आले. या ट्रकवर पाकिस्तानचा झेंडा होता. त्यावर तालिबानच्या दहशतवाद्यांनी आक्षेप घेतला. पाहता पाहता एका दहशतवाद्याने ट्रकवर असलेला झेंडा काढला आणि त्याची कॅमेरासमोरच विटंबना केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com