रियाध - वैश्विक तापमानवाढीमुळे जगाची होरपळ होऊ लागली असून पृथ्वीचा पृष्ठभाग हा आता शुष्क पडू लागला आहे. यामुळे वनस्पती आणि प्राण्यांची जीवन जगण्याची क्षमता नष्ट होऊ लागली असल्याची धक्कादायक माहिती संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) अहवालातून समोर आली आहे..पृथ्वीचे होणारे वाळवंटीकरण रोखण्यासाठी नेमके कोणते उपाय आखले जावेत? या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी प्रमुख देशांच्या उपस्थितीमध्ये सौदी अरेबियात संमेलन सुरू असून त्यात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. याबाबतचा अहवाल आज येथील संमेलनामध्ये प्रसिद्ध करण्यात आला..पृथ्वीवरील कधीकाळी सुपीक मानल्या जाणाऱ्या भागाचे वाळवंटीकरण होऊ लागले असून याला मानवनिर्मिती वैश्विक तापमान वाढ कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. पृथ्वीवरील अनेक देशांतील पाण्याचा साठा संपू लागला असून जंगलाचे आच्छादन कमी होऊ लागल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.साधारणपणे १९७० ते २०२० हा कालखंड लक्षात घेतला तर जगातील तीन चर्तुथांशापेक्षाही अधिक भागाला शुष्क अवस्थेला सामोरे जावे लागल्याचे दिसून आले आहे. त्याआधीच्या तीस वर्षांतील परिस्थितीपेक्षा आताची स्थिती अधिक गंभीर असल्याचे दिसून आले..उपाययोजनांबाबत चर्चा होणारसंयुक्त राष्ट्रांच्या वाळवंटीकरणविरोधी परिषदेचे अध्यक्ष इब्राहिम थियॉ म्हणाले की आज जे भाग वेगाने शुष्क अथवा कोरडे होत चालले आहेत त्या ठिकाणी पुन्हा कधीच हिरवळ येऊ शकत नाही. यामुळे पृथ्वीवरील सगळे जीव चक्रच बदलत चालले आहे.मागील आठवड्यामध्ये सुरू झालेल्या या संमेलनाचा येत्या शुक्रवारी समारोप होणार आहे. पृथ्वीवर निर्माण झालेली दुष्काळसदृश स्थिती आणि भीषण पाणी टंचाई यांचा सामना नेमका कसा करायचा? याबाबत थेट उपाययोजना आखण्याबाबत या संमेलनामध्ये चर्चा करण्यात येईल..पाच अब्ज लोकांना फटकावैश्विक तापमानवाढ याच वेगाने होऊ लागली तर त्याचा पाच अब्ज लोकांना फटका बसू शकतो. युरोप, पश्चिम अमेरिका, ब्राझील, पूर्व आशिया आणि मध्यवर्ती आफ्रिकेमध्ये याची तीव्रता अधिक असेल. या शतकाच्या अखेरपर्यंत ही परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते असे मानले जाते. जगातील एकूण लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोकसंख्येला त्याचा फटका बसू शकतो असा इशारा या अहवालाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.....तर कुणालाच पाणी नाहीसंयुक्त राष्ट्रांच्या वाळवंटीकरण विरोधी परिषदेचे प्रमुख संशोधक बॅरन ओर म्हणाले की लोकांना पाणी कमी मिळू लागल्याने त्याचे अत्यंत भयंकर असे दूरगामी परिणाम होतील. मुख्य म्हणजे आता जी निसर्गाची हानी होते आहे ती पुन्हा भरून काढणे शक्य नसेल. संशोधक सर्गिओ व्हिसेंटो सेरानो म्हणाले, कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू मोठ्या प्रमाणावर जाळल्याने वातावरण तापले आहे. यामुळेच बाष्पीभवनाचाही वेग वाढलेला दिसतो. प्राणी, पशू आणि पक्ष्यांना पाणीच मिळाले नाही तर त्यांना तग धरणे अधिक कठीण होऊन जाईल..संभाव्य परिणामसर्वांत मोठा फटका शेती क्षेत्राला बसू शकतोजगाच्या अन्नसुरक्षेवर परिणाम होणारअनेक देशांत आर्थिक सुधारणांना खीळ बसेलयुरोप, पश्चिम आशियाला आर्थिक फटका शक्यउत्तर आफ्रिका, दक्षिण आशियाची कोंडी होणार.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.