श्रीमंत देश असूनही नागरिक मोफत फूड पाकिटासाठी रांगेत; कोठे ते वाचा सविस्तर

switzerland
switzerland

जिनीव्हा - कोरोना संसर्गाने भल्याभल्यांना जमीनीवर आणले आहे. यापासून श्रीमंत देशही अपवाद राहिले नाहीत. निसर्गसंपन्न असणारा स्वित्झर्लंड देशातील मध्यमवर्गीय, गरीब नागरिक आर्थिक चणचणीमुळे हतबल झाले आहेत. उत्पन्न कमी झाल्याने आणि नियमित खर्चाचा बोजा वाढल्याने स्वित्झर्लंडचे नागरिक आता मोफत फूड पाकिटासाठी तासनतास वाट पाहत आहेत. स्विझर्लंडची राजधानी जिनीव्हा शहरात मोफत भोजनासाठी नागरिकांची एक किलोमीटरपर्यंत रांग लागली होती. विशेष म्हणजे या रांगेत गरीब आणि कागदपत्रे नसलेले स्थलांतरित नागरिकही होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील काही स्वयंसेवी संस्थांकडून आठवडाभरापासाठी दीड हजार फूडपॅकेटचे वाटप केले जात आहे. मोफत पाकिटासाठी रविवार पहाटेपासूनच रांग लागली होती.

जिनीव्हा महागडे शहर
स्वित्झर्लंडमधील सिंगल पॅरेंट असणारे आणि कमी शिक्षित असणारे नागरिक गरीब समजले जातात. त्यांना सध्या काम मिळण्यास अडचणी येत आहेत. यूबीएस बँकेच्या मते, तिघांच्या कुटुंबासाठी जिनेव्हा हा दुसरे सर्वात महागडे शहर आहे. मात्र स्थानिक नागरिकांचे सरासरी उत्पन्न चांगले आहे. फरंतु आर्थिक अडचणीत असणाऱ्या नागरिकांना त्याचा फारसा फायदा होत नाही.

रांगेत एक हजार नागरिक
धनाढ्य स्वित्झर्लंडमध्ये नागरिक अन्नासाठी धडपड करत आहेत. एक आठवड्यासाठी मोफतपणे अन्नाची पाकिटे दिली जात असून जिनीव्हा शहरात सुमारे एक हजार नागरिकांची रांग लागलेली दिसून आली. रविवारी मिळणाऱ्या पाकिटासाठी नागरिक पहाटेपासूनच रांगेला लागले होते.

लॉकडाउनची स्थिती
कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी बहुतांश देशांनी लॉकडाउनचे हत्यार वापरले आहे. युरोपातील देशांना कोरोनाचा जबर फटका बसलेला असतानाही स्वित्झर्लंडमध्ये लॉकडाउनचे नियम फारसे कठोर नाही. परंतु सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येऊ शकत नाहीत. रेस्टॉरंट सुरू आहेत, परंतु तेथे भोजन करुन शकत नाही. लगत देशांच्या सीमा बंद आहेत. दुसऱ्या देशातून येणारे रस्ते बंद आहेत. आपत्कालिन पासच्या आधारे स्वित्झर्लंडमध्ये रस्त्याने जाता येते. एवढेच नाही तर इथे मास्क घालणे देखील बंधनकारक नाही. उच्च प्रतिचे मास्क उपलब्ध झाल्यानंतर सरकारकडून त्याची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.

जगातील श्रीमंत शहरांपैकी एक असणाऱ्या जिनीव्हातील राहणीमान अतिशय उच्च आहे. घरकाम करणारे, शेतीकाम करणारे, बांधकाम प्रकल्पावर काम करणारे आणि हॉटेलमध्ये काम करणाऱ्या लोकांची नोकरी कोविडमुळे गेली आहे.
- पॅट्रिक विलँड, डॉक्टर्स विदाउट बॉडर्स समूह

स्वित्झर्लंडची स्थिती
८६,००,००० -  लोकसंख्या (२०१८)
६,६०,००० -  गरीबांची संख्या
३०,३०५ - रुग्णांची संख्या
११,००,००० - कमी उत्पन्नधारक
१८३० - मृतांची संख्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com