WHOच्या मान्यतेनंतरही चीनच्या लसीकडे देशांची पाठ

का नाकारलं जातंय चीनचं व्हॅक्सीन?
Corona Vaccine
Corona VaccineSakal

चीनपासून कोरोनाचा (corona) उद्रेक झाला आणि या विषाणूने संपूर्ण जगात पाय पसरले. विशेष म्हणजे कोरोनाचं केंद्रस्थान असलेल्या चीनने या विषाणूवर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे चीनमध्ये तयार करण्यात आलेलं कोरोना व्हॅक्सीन (corona vaccine) अन्य देशांना देऊन कोरोनाचा प्रसार थांबवता येईल असं म्हणत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चीनच्या व्हॅक्सिनला मान्यता दिली आहे. मात्र, डब्ल्युएचओच्या मान्यतेनंतरही अनेक देशांनी चीनची लस घेण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे युएई, बहरीन आणि मध्य-पूर्वेकडील अनेक देशांनी या व्हॅक्सीनला परवानगी दिलेली नाही. त्यामुळेच WHO ची मान्यता असतानाही चीनची ही लस का नाकारली जातीये ते जाणून घेऊयात. (despite-who-approval-of-corona-vaccine-why-globally-chinese-vaccine-not-acceptable)

सध्याच्या घडीला चीन ८० देशांमध्ये त्यांचं व्हॅक्सीन एक्सपोर्ट करत आहे. मात्र, तरीदेखील त्यांच्या व्हॅक्सीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. विशेष म्हणजे चीनच्या व्हॅक्सिनला मान्यता दिलेल्या देशातील नागरिकांना युएईमध्ये प्रवेश मिळणार नाही, असा फर्मानही युएई सरकारने काढला आहे.

Corona Vaccine
'सजीवसृष्टी नष्ट होण्यामागे एलियन ठरतील कारण'

का नाकारलं जातंय चीनचं व्हॅक्सीन

चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या कोविड व्हॅक्सीनवर अलिकडेच प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आफ्रिका खंडातील सेशल्स हा देश जगातील सर्वात जास्त लसीकरण करणारा देश ठरला होता. मात्र, आता पुन्हा या देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे लसीकरणासाठी या देशाने चीनच्या सिनोफॉर्म या व्हॅक्सीनची खरेदी केली होती. देशातील अनेकांनी लसीचे दोन डोसही घेतले होते. मात्र, मे महिन्यात येथील कोविडग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढली. विशेष म्हणजे या कोविडग्रस्तांपैकी ३७ टक्के लोकांनी चीनच्या सिनोफॉर्मचे डोस घेतले होते. तेव्हापासून अन्य देशांमध्ये या व्हॅक्सीनविषय़ी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळेच सौदी अरेबिया, बहरीन, युएई आणि फिलिपीन्स यांनी चीनच्या व्हॅक्सीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Corona Vaccine
Fact Check: घरगुती उपचारांमुळे कोरोना बरा होतो? सत्य आलं समोर

दरम्यान, चीनच्या व्हॅक्सीनवर सौदी अरेबियाने चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सिनोवाक आणि सिनोफार्म या व्हॅक्सीनलाही मंजुरी दिली नाही. त्यामुळे चीनच्या लसीवर अवलंबून असलेल्या पाकिस्तान आणि अन्य देशांच्या चिंतेतही भर पडली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com