An aerial photograph taken on Saturday showing houses buried in mud at Devighat in Nuwakot district following the floods in Nepal
sakal
काठमांडू - नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या जलप्रलयातील बळींचा आकडा शनिवारी ६६९ वर पोहोचला. हजारो जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असले, तरी २,५०० हून अधिक जण अद्याप बेपत्ता असल्याचे चित्र आहे. बचावकार्याला वेग आला असून, जगभरातून नेपाळला आर्थिक मदतीचा ओघ सुरू आहे. बेपत्ता नागरिकांच्या नातेवाइकांना अद्यापही आपले कुटुंबीय, आप्तस्वकीय परत येतील, अशी आशा आहे.