Diamonds From Cow : आता गायीचा ढेकर आणि गॅसपासून बनवणार हिरे,  iPod निर्माता टोनी फैडेल यांचा दावा!

वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल पण हे खरे आहे
Diamonds From Cow
Diamonds From Cow esakal

Diamonds From Cow :

अथक परिश्रम आणि मेहनतीने माणूस चंद्रावर पोहोचला आहे. तेही केवळ धाडस आणि विविध शोधाच्या जोरावर. असाच एक आश्चर्यचकीत करणारा शोध माणसाने लावला आहे. तो म्हणजे गायीचा ढेकरापासून हिरे बनवण्याचा होय.  

वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल पण हे खरे आहे. iPod चा शोध लावून त्याची यशस्वी निर्मिती करणाऱ्या टोनी फॅडेल यांनी गायीचा ढेकर आणि गॅसेसमधील मिथेन वायूने हिरे बनवण्याचा कामासाठी वापरला आहे.

Diamonds From Cow
Cow Hug Day Viral Memes : व्हॅलेंटाइन्स डे दिवशी 'काऊ हग डे'; सोशल मीडियालर नेटकरी सैराट

मेट्रो या इंग्रजी वेबसाईटनुसार, टोनी फॅडेल हे गायींच्या ढेकर आणि गॅसेसमधून बाहेर पडणाऱ्या मिथेनचे हिऱ्यांमध्ये रूपांतर करत आहेत. जे आज इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरले जात आहे.

ब्रातिस्लाव्हा येथील स्टारमस फेस्टिव्हलमध्ये जेव्हा त्याने आपल्या नवीन प्रयोगाची माहिती जगासमोर मांडली तेव्हा लोकांना खूप आश्चर्य वाटले. गेल्या काही वर्षांत मी अब्जावधी आणि ट्रिलियन उत्पादने बनवली आहेत जी आज जग वापरत आहे, परंतु आता माझे हे उत्पादन पृथ्वी वाचवण्यासाठी आहे, असे टोनी म्हणाले.

Diamonds From Cow
Cow Milk : 'गोकुळ'नंतर राज्यातील खासगी-सहकारी दूध संघांकडून गाईच्या दूध दरात 'इतक्या' रुपयांची कपात

अशी कंपनी हिरे तयार करेल, असे सांगून ते पुढे म्हणाले की, आता मी माझा जास्तीत जास्त वेळ अशा वस्तू तयार करण्यात घालवत आहे जे पृथ्वीला मदत करतील.

आता मिथेन गळती शोधण्यासाठी माझ्या टीमने या वर्षाच्या सुरुवातीला मिथेनसॅट नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला आहे. ज्याच्या मदतीने आपल्याला मिथेनचा स्त्रोत कळेल कारण हिरे बनवण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात मिथेनची आवश्यकता असेल.

Diamonds From Cow
Protectors of Cows : गायींच्या रक्षणकर्त्याला हवाय समाजाचा आधार!

माझ्या या प्रकल्पासाठी मी डायमंड फाउंड्री नावाची कंपनी सुरू केली आहे. जे जमिनीतून किंवा गायीसारख्या प्राण्यांपासून बायोमिथेन घेईल आणि कृत्रिम हिरे तयार करेल.

माझ्या या शोधाचा उद्देश एवढाच आहे की, आपण पृथ्वीवरील मिथेन कसेतरी थांबवण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून ते वातावरणात पसरू नये कारण त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे आणि आपले अस्तित्व धोक्यात आले आहे. हे लक्षात घेऊन मी CH4 ग्लोबल नावाची दुसरी कंपनी स्थापन केली.

Diamonds From Cow
Cow Hug Day : 14 फेब्रुवारीला 'काऊ हग डे' साजरा करा'; केंद्राचे देशवासियांना आवाहन

त्यामुळे आम्ही रेड सीव्हीड बनवतो. ते चारा मिसळून गायींना खाऊ घातल्यास त्यांची ढेकर ८० ते ९० टक्के कमी होते. टोनी अगदी बरोबर आहे कारण एकदा मिथेन सोडले की ते मानवांसाठी 80 टक्के हानिकारक बनते, कारण, ते 20 वर्षे वातावरणात राहते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com