चीनचे विमान पाडले का नाही? तैवानने केला खुलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 4 September 2020

याबाबतचा एक व्हिडिओदेखील प्रसिद्ध झाला होता

तैपेई : चीनचे लढाऊ विमान तैवानच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाडल्याचा दावा चुकीचा असल्याचे तैवानने आज स्पष्ट केले. येथील सोशल मीडियावर आणि त्यामुळे जगभरात हे वृत्त पसरले गेले होते. याबाबतचा एक व्हिडिओदेखील प्रसिद्ध झाला होता. चीनचे एक विमान व्हीएतनामच्या सीमेला लागून असलेल्या गुआन्शी प्रांतात कोसळत असल्याचे त्यात दिसत होते. यावरून सोशल मीडियावर चर्चेला ऊत आला होता. यामुळे तैवाननेच पुढाकार घेत हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले.

मुलाच्या आग्रहाखातर आईचा चेहरा दाखविला तर उघडकीस आला धक्‍कादायक प्रकार

चीन आणि तैवानमध्ये सध्या तणावपूर्ण आहे. त्यातच तैवानने चीनचे सुखोई विमान पाडल्याची चर्चा रंगली होती. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या रिपोर्टसनंतर तैवानने आपल्या हद्दीत आलेल्या चीनच्या  सुखोई-35 विमान पाडल्याची बातमी दिल्यानंतर हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. यासाठी तैवानने अमेरिकन पेट्रियाट मिसाइल सिस्‍टमचा वापर केल्याचेही बोलले जात होते. मात्र, तैवानने खुलासा केला असून चीनचे विमान पाडले नसल्याचं म्हटलं आहे.  

हद्दीत घुसलेल्या चिनी विमानाला तैवानच्या हवाईदलाकडून पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. मागील काही महिन्यांपासून चिनी लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीत गिरट्या घालत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यापूर्वी तैवानने आपल्या हद्दीत घुसल्यानंतर चिनी विमान हुसकावून लावल्याचा प्रकारही समोर आले होते. त्यानंतर आलेल्या या बातमीने दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत मिळत होते. मात्र, ही चर्चा आता येथेच शमण्याची शक्यता आहे. 

'जाईन तर रेल्वेनेच', एका मुलीच्या हट्टासाठी 'राजधानी' धावली...

दरम्यान, चीनच्या कोणत्याही प्रकारच्या आक्रमणाचे प्रत्युत्तर देण्यासाठी तैवानचे नौदल आणि हवाई दलाला सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. राष्ट्रपती त्साई इंग-वेन यांनी सैन्याची ताकद वाढवण्यासंदर्भात अनेक घोषणाही यापूर्वी केल्या आहेत. तैवान राखीव सैन्य दल विकसित करण्यावरही भर देत आहे. दोन्ही देशातील तणावात तैवानने अमेरिकेकडून खरेदी केलेल्या  पॅट्रियॉट एडवांन्स कॅपिबिलिटी-3 मिसाइल खरेदीची भर पडली आहे. अमेरिकेसोबत तैवानने जवळपास 620 मिलियन डॉलरचा करार केला आहे. याचाही चीनला राग आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: did Chinese plane crash Taiwan reveals