Suicide Bombing at Wedding in Pakistan
esakal
Suicide Bombing at Wedding in Pakistan: पाकिस्तानमधील डेरा इस्माइल खान जिल्ह्यात एका लग्नसमारंभात भीषण आत्मघाती हल्ला झाला आहे. मुख्य लग्न समारंभ सुरु असतानाच ही घटना घडली आहे. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.