चीन पुन्हा कुरघोड्या करण्याच्या तयारीत; अणू बॉम्बर विमानांची दिशा लडाख परिसराकडे

The direction of the atomic bomber aircraft towards the Ladakh area
The direction of the atomic bomber aircraft towards the Ladakh area

बिजिंग- चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतासोबत शांती आणि स्थैर्यासाठी चर्चा करत असताना, दुसरीकडे पीपल्स लिबरेशन आर्मी सीमा भागात आपली शक्ती वाढवताना दिसत आहे. उपग्रह छायाचित्रांमधून हे स्पष्ट होत आहे. छात्राचित्रांमध्ये चीनच्या पीएलआयने सीमेजवळील काशगर हवाईतळावर लढाऊ विमाने तैनात केल्याचं दिसत आहे. 'नवभारत टाईम्स'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

"राफेलमध्ये बेरोजगारी आणि आर्थिक संकट दूर करण्याची क्षमता आहे का?"

हवाईतळावर सामरिक बॉम्बर आणि अन्य उपकरणे तैनात असल्याचं ओपन इंटेलिजेंस सोर्स Detresfa च्या उपग्रह छायाचित्रांमध्ये दिसत आहे. चीनचे हे हवाईतळ सीमेपासून जवळ असल्याने भारतासोबत असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तैनाती करण्यात आल्याची शंका घेतली जात आहे. उपग्रह छायाचित्रांमध्ये तळावर 6 शियान H-1 बॉम्बर असून त्यातील दोन पेलोडसह आहेत. याशिवाय 12 शियान JH-7 लढाऊ बॉम्बर असून त्यातील दोन पेलोडसह आहेत. यात, 4 शेनयान्ग J11/16 लढाऊ विमाने असून यांची रेंज 3530 किलोमीटरची आहे.

धोकादायक H-1 बॉम्बर 

H-1 बॉम्बर अण्वस्त्र घेऊन जाण्याची क्षमता ठेवतात. लडाखपासून या तळाचे अंतर 600 किलोमीटरचे असून H-1 ची रेंज 6000 किलोमीटरची आहे. विशेष म्हणजे चीनने H-6J आणि H-6G विमानांसोबत दक्षिण चीन समुद्रात युद्ध अभ्यास केला होता. चीनने या युद्ध अभ्यासाला रुटीन असल्याचं म्हटलं होतं.

चीन जवळ आहेत 250 शेनयान्ग

शेनयान्ग 2500 किलोमीटर प्रति तास या वेगाने उडू शकते. सध्या चीनकडे 250 अशाप्रकारची विमाने आहेत. ही विमाने रशियाच्या एसयू 27 एसकेचे परवाना आवृत्ती आहेत. शेनयान्ग हवाई क्षेत्राचे रक्षण आणि जमिनीवर हल्ला करण्यासाठी सक्षम आहेत. या विमानांमध्ये 30 किलोमीटर रेंजची एक कैननही लावण्यात आली आहे. तसेच यावर अनेक प्रकारची क्षेपणास्त्रे लावले जाऊ शकतात.

या अगोदर चीनने भारताला लागून असलेली 8 हवाईतळे सक्रिय केल्याची माहिती आली होती. यामुळे चीन आपल्या युद्ध हालचाली तात्काळ सुरु करु शकणार आहे. सैतुलामध्ये चीन जवानांना फार काळ थांबण्यासाठी आणि लडाखमध्ये त्यांच्या तैनातीसाठी प्रशिक्षण सुविधा जमवत आहे. चीनने नव्या छावण्या आणि हेलीपोर्ट तयार केले आहे. याशिवाय चीनने सैतुलामध्ये तोफा आणि अन्य घातक शस्त्र तैनात केले आहेत. नुकतेच शिनजियांग प्रांतातील होटान हवाईतळावर तैनात चीन लढाऊ विमानांची छात्राचित्रे समोर आली होती. चीनने आपल्या हवाई तळावर शेनयांग जे-11 लढाऊ विमाने तैनात केली आहेत, ज्यांची रेंज 3530 किलोमीटरची आहे. 

(edited by-kartik pujari)
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com