

Mickey Mouse
sakal
वॉशिंग्टन : सध्या कलेच्या क्षेत्रामध्येही कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) बोलबाला पाहायला मिळतो. जागतिक कीर्तीची ‘डिस्ने’ ही कंपनी ‘ओपनएआय’मध्ये तब्बल एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असून यामाध्यमातून मिकी माउस, सिंड्रेला आणि ल्यूक स्कायवॉकर ही पात्रे ‘सोरा व्हिडिओ जनरेशन टूल’वरती येतील. दोन्ही कंपन्यांकडून याबाबतच्या कराराची अधिकृत घोषणा आज करण्यात आली.