हिंदू मंदिरांना पाकिस्तानमध्ये अवकळा

Hindu-Temple
Hindu-Temple

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये अल्पसंख्य हिंदू समुदायाच्या प्राचीन मंदिरांची स्थितीही त्यांच्याप्रमाणेच बिकट असल्याचे चित्र आहे. स्थानिक प्रशासनाचे या मंदिरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने त्यांची पडझड झाली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयोगाने त्यांच्या अहवालात म्हटले आहे.

एक सदस्यीय आयोगाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हिंदू समुदायाच्या सर्वांत पवित्र मंदिरांच्या अवस्थेचे निराशाजनक वास्तव मांडले. अल्पसंख्य समुदायाच्या प्राचीन आणि पवित्र स्थानांच्या देखभालीची व्यवस्था असलेल्या सरकारी मंडळाचे संपूर्ण दुर्लक्ष या स्थितीला कारणीभूत असल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com