अमेरिकेने चीनला पुन्हा डिवचले

यूएनआय
Monday, 24 August 2020

तैवानच्या अध्यक्ष त्साई इंगवेन यांनी आज सैनिक स्मृती स्थळाला भेट दिली. यावेळी त्यांच्याबरोबर अमेरिकेचे प्रतिनिधी विल्यम ब्रेंट ख्रिस्टन्सन यांनी देखील हजेरी लावत चीनला पुन्हा डिवचले आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या आरोग्य मंत्र्यांनी तैवान दौरा केला होता.

किनमेन (तैवान) - तैवानच्या अध्यक्ष त्साई इंगवेन यांनी आज सैनिक स्मृती स्थळाला भेट दिली. यावेळी त्यांच्याबरोबर अमेरिकेचे प्रतिनिधी विल्यम ब्रेंट ख्रिस्टन्सन यांनी देखील हजेरी लावत चीनला पुन्हा डिवचले आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या आरोग्य मंत्र्यांनी तैवान दौरा केला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनला तैवानचे स्वतंत्र अस्तित्व मान्य नसून अमेरिकेने गेल्या काही महिन्यांपासून तैवानला वेगळा देश म्हणून वागूणक देण्यास सुरवात केली आहे. १९५८ मध्ये चीनच्या बाँब हल्ल्यात ठार झालेल्या सैनिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ येथे स्मारक उभारण्यात आले आहे. अमेरिकेचेही तैवानबरोबर अधिकृत राजनैतिक संबंध नाहीत. मात्र या दोघांमध्ये मोठा शस्त्रव्यापार आहे. अमेरिकेचा येथे दूतावास नसला तरी येथे अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ तैवान ही संस्था आहे. या संस्थेतील सर्व कर्मचारी अमेरिकेच्या गृह खात्याच्या अंतर्गत काम करतात.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disturbance Increase in America and China

Tags
टॉपिकस
Topic Tags: