
कोरोना महामारीवर मात करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली आहे.
वॉशिंग्टन- कोरोना महामारीवर मात करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली आहे. असे असतानाच फायझर कंपनीची लस घेतल्यानंतर एका आरोग्य कर्मचाऱ्याची तब्येत बिघडल्याची घटना समोर आली आहे. मॅक्सिकोतील एका 32 वर्षीय महिली डॉक्टरमध्ये फायझर-बायोएनटेकची कोरोना लस टोचून घेतल्यानंतर दुष्परिणाम दिसून आल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
AUSvsIND : पराभवानंतर ऑस्ट्रेलिया मीडियाची सटकलीये? कोहली-पांड्यावर केला गंभीर...
महिला डॉक्टरचे नाव जाहीर करण्यात आले नसून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्याची वेळ आली आहे. श्वास घेण्यात त्रास होणे आणि त्वचेवर डाग पडत असल्याच्या कारणास्तव महिला डॉक्टरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. महिलेला एन्सेफॅलोमाइलिटिस (encephalomyelitis) झाल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी शनिवारी जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. एन्सेफॅलोमाइलिटिसमध्ये मेंदूला हानी पोहोचते.
आरोग्य मंत्रालयाने सांगितलेल्या माहितीनुसार महिला डॉक्टरला अॅलर्जीचा त्रास आहे. शिवाय फायझर लशीच्या संपूर्ण चाचणीदरम्यान कोणालाही मेंदू संबंधी आजार झाल्याचा पुरावा नाही, असं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. फायझर-बायोएनटेकने यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मॅक्सिकोमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे 1,26,500 लोकांचा जीव गेला आहे. मॅक्सिको 24 डिसेंबरपासून आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना फायझर कोरोना लशीचा पहिला डोस देत आहे. मात्र, नव्या घटनेमुळे लसीकरण मोहिमेवर परिणाम पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कॉमेडी करताना हिंदू देवतांसह अमित शहांचा अपमान, मुनव्वर फारुकीला अटक
दरम्यान, जगातील काही देशांमध्ये कोरोनाचे लशीकरण सुरु झालेले आहे. लशीकरणानंतर आलेल्या सुरवातीच्या रिपोर्ट्सनंतर डॉक्टर्स आणि संशोधकांची चिंता वाढलेली दिसून आली आहे. कारण अमेरिका आणि ब्रिटनमधील माहितीनुसार, फायझरच्या लशीमुळे अनेक लोकांना एलर्जी झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. सध्या अमेरिकेत आपत्कालीन वापरासाठी फायझरच्या लशीला मान्यता देण्यात येऊन लशीकरणास सुरवात झाली आहे. तर ब्रिटनमध्ये फायझर आणि ऑक्सफर्डची एस्ट्राझेनेकाची लस लोकांना दिली जात आहे. पण, मॅक्सिकोमधील घटनेमुळे वैज्ञानिकांची चिंता वाढली आहे.