Summary
ट्रम्प यांनी हा निर्णय चीनच्या दुर्मिळ खनिज निर्यात निर्बंधांच्या उत्तरादाखल घेतल्याचे सांगितले.
विश्लेषकांच्या मते या तणावामुळे जागतिक पुरवठा साखळीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
या घडामोडींमुळे जागतिक मंदी येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
अमेरिकेने चीनवर अतिरिक्त १०० टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतर रविवारी चीनने अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनावर दुहेरी धोरणांचा आरोप केला. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने सांगितले की,"अमेरिकेचे विधान हे तथाकथित दुटप्पीपणाचे उदाहरण आहे." शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात केलेल्या वस्तूंवर अतिरिक्त १०० टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतर ही प्रतिक्रिया समोर आली आहे. यामुळे चीनचा संताप वाढला असून जागतिक मंदीची शक्यता वर्तवली जात आहे.