Donald Trump यांना मध्यावधी निवडणुकांपूर्वी मोठा धक्का; लोकप्रियता ३१ टक्क्यांवर, डेमोक्रॅट्सना आघाडी

Donald Trump’s Approval Rating Falls to 31% : अमेरिकेतील ताज्या सर्वेक्षणात डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता ३१ टक्क्यांवर घसरली असून, मध्यावधी निवडणुकांपूर्वी डेमोक्रॅट्सना आघाडी मिळाली आहे.
US President Donald Trump faces declining approval ratings, with a Reuters-Ipsos poll showing 31% approval and Democrats leading Republicans in voter preference ahead of the November 3, 2026, US midterm elections

esakal

Updated on: 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आगामी मध्यावधी निवडणुकांपूर्वी मोठा राजकीय धक्का बसल्याचे रॉयटर्स आणि इप्सोसच्या ताज्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ट्रम्प यांच्या कामगिरीला पसंती देणाऱ्या अमेरिकन नागरिकांचे प्रमाण ३१ टक्क्यांवर आले असून, त्यांच्या दोन्ही कार्यकाळांतील हा सर्वात नीचांकी आकडा असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे, आगामी काँग्रेस निवडणुकीत ४७ टक्के मतदारांनी डेमोक्रॅटिक पक्षाला पसंती दर्शवली आहे, तर रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने ३५ टक्के नागरिकांनी कौल दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील सत्तासमीकरणांबाबत डेमोक्रॅट्सच्या आशा वाढल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com