रशियाशी खराब संबंधांसाठी एफबीआय जबाबदार : ट्रम्प

यूएनआय
मंगळवार, 17 जुलै 2018

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबरच्या आपल्या पहिल्या शिखर बैठकीपूर्वी वातावरणनिर्मिती करताना दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांसाठी एफबीआयला (अमेरिकी गुप्तचर संस्था) जबाबदार ठरवले. 

हेलसिंकी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबरच्या आपल्या पहिल्या शिखर बैठकीपूर्वी वातावरणनिर्मिती करताना दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांसाठी एफबीआयला (अमेरिकी गुप्तचर संस्था) जबाबदार ठरवले. 

अमेरिकेचे विशेष वकील रॉबर्ट मूलर यांच्या चौकशीचा हवाला देताना ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की रशियाबरोबर आमचे संबंध कधीच एवढे खराब नव्हते आणि याचे कारण अनेक वर्षांपासूनची अमेरिकेचा मूर्खपणा, तसेच लक्ष्य करून केली जाणारी चौकशी आहे. 

गेल्या आठवड्यात मूलर यांनी 2016मध्ये झालेल्या अमेरिकी निवडणुकीदरम्यान ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्‍लिंटन आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे संगणक सर्व्हर हॅक करणे तसेच नंतर ते लीक केल्याचा आरोप बारा रशियन गुप्तचर अधिकाऱ्यांवर केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump Blames Bad Russia Ties On FBI