ट्रम्प यांच्याकडे केवळ एकच आयफोन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वैयक्तिक सेलफोनवरील संभाषण रशिया आणि चीनचे गुप्तहेर चोरून ऐकत असतात, असा दावा करणारे वृत्त न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्ध केल्यानंतर खळबळ निर्माण झाली होती. आता या वृत्ताची 'व्हाईट हाऊस'ने दखल घेत ट्रम्प यांच्याकडे केवळ एकच अधिकृत आयफोन असून त्याचे सुरक्षा कवच भेदणे कोणालाच शक्‍य नसल्याचे म्हटले आहे. 

न्यूयॉर्क टाईम्सने अमेरिकी गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये ट्रम्प यांच्याकडे तीन सेलफोन असून यातील एका सेलफोनवरील त्यांचे खासगी संभाषण चीन आणि रशियाचे गुप्तहेर चोरून ऐकत असल्याचा दावा केला होता.

ट्रम्प यांनी मात्र ही बातमी फेक न्यूज असल्याचा दावा करत आपण क्वचितप्रसंगीच सेलफोन वापरतो असे म्हटले होते. दरम्यान 'व्हाईट हाऊस'च्या खुलाशानंतर आणि खुद्द ट्रम्प यांच्या ट्विटनंतरदेखील 'न्यूयॉर्क टाईम्स'ने आपल्या वृत्ताचे समर्थन केले आहे. 

मित्रांशी संभाषण 
ट्रम्प खासगी आयफोनच्या माध्यमातून त्यांच्या मित्रांशी संवाद साधतात, या फोनवरील त्यांचे संभाषण चिनी आणि रशियन गुप्तहेर चोरून ऐकत असतात. पुढे याच संभाषणाचा आधार घेऊन धोरणे आखली जातात असे या वृत्तात नमूद करण्यात आले होते.

न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे व्हाईट हाऊसचे डेप्युटी प्रेस सेक्रेटरी होगन गिडले यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump carries only One iPhone, says White House