
अमेरिकेतील एका कोर्टाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना झटका दिला आहे. ट्रम्प यांचा बर्थ राईट नागरिकता रोखण्याच्या आदेश रद्दबातल ठरवला. वॉशिंग्टन जे जिल्हा वॉशिंग्टन जिल्हा न्यायाधीश जॉन कॉफनर यांनी ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशाला स्थगिती दिली आहे. तसेच या आदेशाला स्पष्टपणे असंवैधानिक' म्हटले आहे आणि धोरणाची अंमलबजावणी रोखण्यासाठी तात्पुरता प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. त्याच वेळी, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की ते याविरुद्ध अपील करणार आहेत.