Trump Macron France Riots : ‘पॅरिस लवकरच मुस्लिम शहर बनेल’; फ्रान्समधील दंगलीनंतर ट्रम्प यांची मॅक्रॉंन यांच्यावर बोचरी टीका

France Protests : ट्रम्प यांनी मॅक्रॉन यांचे स्थलांतर धोरण चुकीचे ठरवले आणि त्यांनी आधीच दिलेल्या सीमा-नियंत्रणाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा केला. हा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्समधील निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर केला.
Trump Criticises Macron Over France Immigration Policy

Trump Criticises Macron Over France Immigration Policy

esakal

Updated on: 

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या निदर्शनांच्या आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या इमिग्रेशन धोरणावर टीका केली आहे. ‘पॅरिस लवकरच मुस्लिम शहर बनेल’, असा दावा ट्रम्प यांनी केला. इतर देशांमधून मोठ्या संख्येने लोकांना फ्रान्समध्ये प्रवेश देणे ही मोठी चूक ठरेल, असा इशारा आपण मॅक्रॉन यांना अनेक वर्षांपूर्वीच दिला होता, असेही त्यांनी म्हटले. मात्र, फ्रान्समधील सध्याच्या निदर्शनांमागे महागाई, वाढता राहणीमानाचा खर्च आणि सार्वजनिक सेवांबाबतचा असंतोष ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com