डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगीच त्यांच्या विरोधात; आंदोलनकर्त्यांना दिलं समर्थन

Donald trump daughter support protester in george floyed case
Donald trump daughter support protester in george floyed case
Updated on

वॉशिंग्टन- कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिक जॉर्ज फ्लॉइड यांचा पोलिसांच्या कारवाईत मृत्यू झाला होता. त्यामुळे अमेरिकेमधील वातावरण तापलं असून अनेक लोक रस्त्यावर उतरुन निदर्शने करत आहेत. राष्ट्रपती डॉनाल्ड ट्रम्प यांनी या आंदोलनकर्त्यांविरोधात दांडगाईचा मार्ग अवलंबवला आहे. असे असताना ट्रम्प यांच्या छोट्या कन्या टिफनी ट्रम्प यांनी आंदोलनकर्त्यांना समर्थन दर्शवले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कायद्याची डिग्री घेतलेल्या टिफनी यांनी इंस्टाग्रामच्या माध्यमातून जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक काळ्या पडद्याची फोटो पोस्ट केली असून #blackoutTuesday, #justiceforgeorgefloyd असा हॅशटॅग वापरला आहे. तसेच,' एकट्याने आपण खूप कमी मिळवू शकतो, पण एकत्र असल्यास खूप काही मिळवता येतं', असा हेलर केलर यांचा कोट शेअर केला आहे.

व्हाइट हाउसच्या बाहेर प्रदर्शन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी अश्रू नळकांड्या फोडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर टिफणी यांचं वक्तव्य आलं आहे. वडील डोनाल्ड ट्रम्प यांना याबाबत समजवण्याची मागणी अनेकांनी टिफणी यांच्याकडे केली होती. टिफणी यांच्या आई मार्ला मैपल्स (डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या पत्नी) यांनीही आंदोलनकर्त्यांचं समर्थन करत काळ्या पडद्याची फोटो शेअर केली आहे. आंदोलनकर्त्यांवर जेव्हा दडपशाही केली जात होती, त्यावेळी ट्रम्प एका चर्चमध्ये फोटो काढून घेत होते. यामुळे त्यांच्यावर मोठी टीका होत आहे.

------------
कलेक्टरनं ऑफिसमध्येच केला बलात्कार; महिलेचा गंभीर आरोप
------------
भारताच्या संरक्षण सचिवांना कोरोनाची लागण
------------

अमेरिकेतील मिनेपोलिस शहरात 46 वर्षीय कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी एका पोलिसाने त्यांच्या गळ्यावर गुडघा ठेवल्याने गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच अमेरिकेत संतापाची लाट पसरली आहे. अनेक नागरिकांनी पोलिसांनी केलेल्या कृतीचा निषेध केला आहे.

जॉर्ज यांच्या मृत्यूमुळे वंशभेदाचा मुद्दा अमेरिकेत पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कृष्णवर्णीयांसोबत गौरवर्णीय लोकही रस्तावर उतरुन आंदोलनात उत्स्फुर्तपणे भाग घेत आहेत. अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये या आंदोलनाचे लोण पसरले आहे. शिवाय युरोपातील काही देशांमधून सुद्धा आंदोलनकर्त्यांना पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे हा मुद्दा चांगलाच जोर पकडू लागल्याचं दिसत आहे.

अमेरिकेत सध्या सुरु असलेल्या आंदोलनाविरोधात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कडक पवित्रा घेतला आहे. राज्याच्या गव्हर्नरांनी निदर्शकांवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवावं, त्यांना ते शक्य होत नसल्यास राज्यात सैन्य तैनात करण्यात येईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. ट्रम्प यांनी या काळात चेतावणीखोर भाषा वापरली आहे. त्यामुळे निदर्शकांनी आंदोलनाचा जोर अधिकच वाढवला आहे.

काय आहे मूळ प्रकरण?
जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाने २० डॉलरची एक बनावट नोट एका दुकानात चालविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. जॉर्जला त्याच्या कारमधून उतरायला सांगितल्यानंतर त्याने पोलिसांशी हुज्जत घातली व झटापटही केली होती असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर, जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाल्याने देशभर जनक्षोभाची मोठी लाट निर्माण झाली.

अमेरिकेतील विविध राज्यांत लोकांनी उत्स्फुर्तपणे रस्त्यांवर उतरून आंदोलन केले. मिनियापोलिस शहरामध्येही आंदोलकांनी आज संचारबंदी धुडकावून लावत सरकार आणि यंत्रणेविरोधात निदर्शने केली. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी पोलीस तुकड्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. अन्य शहरांमध्ये देखील हे आंदोलनाचे लोण पसरल्याने यंत्रणा सावध झाली आहे. दरम्यान, फ्लॉइड यांची मान दोन्ही गुडघ्यांच्या खाली दाबून धरणाऱ्या श्वेतवर्णीय डेरेक शोविन या पोलिस अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com