Donald Trump: ट्रम्प यांच्याविरोधात गैरव्यवहाराचा खटला, एकाने कोर्टाबाहेरच स्वत:ला घेतलं पेटवून, धक्कादायक व्हिडिओ

Hush Money Trial: अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील एका खटल्यात सुनावणी होत असताना कोर्टाबाहेर एका व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतले आहे.
Man Sets Himself On Fire
Man Sets Himself On Fire

नवी दिल्ली- अमेरिकेमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील एका खटल्यात सुनावणी होत असताना कोर्टाबाहेर एका व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतले आहे. लोवर मॅनहॅटन कोर्टहाऊससमोर हा प्रकार घडला आहे. आंदोलनासाठी असलेल्या कलेल्ट पाँड पार्कमध्ये व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतले असं कळतंय. (Donald Trump Faces Hush Money Trial)

एनबीसी न्यूयॉर्कच्या वृत्तानुसार, व्यक्तीचे नाव मॅक्सवेल अझारेलो (Maxwell Azzarello) असे असल्याचं कळत आहे. व्यक्ती गंभीर भाजला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ट्रम्प यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मॅक्सवेल कोर्टहाऊसच्या बाहेर आला होता. त्याने काही पॅम्प्लेट देखील वाटले होते.(Man Sets Himself On Fire Outside NYC Court VIDEO)

Man Sets Himself On Fire
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश; किती आहे संपत्ती?

व्हिडिओ होतोय व्हायरल

सदर घटनेचा एक थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, मॅक्सवेल हा स्वत:वर काही द्रव टाकून घेतो, त्यानंतर तो खिशातून लायटर बाहेर काढतो आणि स्वत:ला पेटवून घेतो. काही सेकंदामध्ये त्याच्या संपूर्ण शरीराला आग लागते. तेथे जमलेल्या सर्व लोकांसाठी हे धक्कादायक असते. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की , मॅक्सवेलचे संपूर्ण शरीर आगीने वेढलेलं आहे.

शरीराला आग लागल्यानंतर तो इकडे-तिकडे फिरतो, त्यानंतर तो खाली पडतो. व्हिडिओ शूट करणारा व्यक्ती पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं. पोलीस घटनास्थळी पोहोचतात. एक पोलीस आग विझवणाऱ्या उपकरणाने (extinguisher) आग विझवतो. तेथे उपस्थित लोक, पत्रकार हा भयानक प्रकार पाहून धक्क्यात गेले होते.

Man Sets Himself On Fire
Donald Trump: मी जर हरलो तर अमेरिकेत रक्तपात... डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला थेट इशारा

डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात विद्यमान अध्यक्ष आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांचे आव्हान आहे. नोव्हेंबर महिन्यात अमिरेकेमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुका होतील. डोनाल्ड ट्रम्प सध्या अनेक कायदेशीर प्रकरणांमध्ये अडकले आहेत. त्यांच्या विरोधात अमेरिकेच्या अनेक कोर्टात खटले सुरु आहेत. (Donald Trump)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com