

ग्रीनलँडवरून युरोपीय देशांवर कर लादण्याच्या धमक्या आणि लष्करी कारवाईच्या अटकळाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची भूमिका मवाळ करण्याचे संकेत दिले आहेत.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) दरम्यान नाटो सरचिटणीस मार्क रुट यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर, ट्रम्प यांनी युरोपीय देशांवरील प्रस्तावित कर तात्पुरते मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांच्या रणनीतीमध्ये हा एक मवाळ पण अधिक व्यावहारिक बदल म्हणून पाहिला जात आहे.