Trump Immigration Policy : ट्रम्प यांची भूमिका अचानक बदलली! स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याचे धोरण कठोर असल्याची कबुली; भारत-पाकिस्तान अणुयुद्धाबाबतही पुन्हा मोठा दावा

Trump Immigration Policy Shift: अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरविषयक कठोर धोरणाबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. डेमोक्रॅटिक पक्षासोबत काम करण्याची तयारी दर्शवत भारत-पाकिस्तान संघर्षाबाबतही पुन्हा दावा केला आहे.
Trump Immigration Policy Shift

Trump Immigration Policy Shift

esakal

Updated on: 

वॉशिंग्टन (पीटीआय) : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या स्थलांतरविषयक धोरणाबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याचे आपले धोरण खूपच कठोर होते, असे ट्रम्प यांनी म्हटले असून, येत्या काळात डेमोक्रॅटिक पक्षासोबत काम करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली.

तीन नोव्हेंबर रोजी झालेल्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने प्रतिनिधिगृह आणि सिनेट या संसदेच्या दोन्ही सभागृहांवर नियंत्रण मिळविले. रिपब्लिकन पक्षाच्या अनेक जागा जिंकून डेमोक्रॅट्सनी ट्रम्प यांना मोठा राजकीय धक्का दिला. स्थलांतराचा प्रश्न हाताळण्याची पद्धत, अर्थव्यवस्था, इराणमधील युद्ध आणि वाढती महागाई यांबाबत मतदारांमध्ये असलेली नाराजी या निकालातून स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे.

Loading content, please wait...