Donald Trump Iran Attack Threat : डोनाल्ड ट्रम्प यांची इराणवर हल्ला करण्याची पुन्हा धमकी, २-३ दिवसांत युद्ध सुरू होणार?

Middle East Tensions : आखाती देशांच्या विनंतीवरून हल्ला केला नसल्याचा दावा ट्रम्प यांनी केला, जो नंतर फेटाळण्यात आला. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांच्या धमक्या वारंवार बदलत असल्याने त्यांचा प्रभाव कमी होत आहे.
Former US President Donald Trump speaking to media about potential military action against Iran amid rising geopolitical tensions.

Former US President Donald Trump speaking to media about potential military action against Iran amid rising geopolitical tensions.

esakal

Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणवर हल्ला करणार असल्याची घोषणा केली आहे. अमेरिका पुढील दोन ते चार दिवसांत इराणवर पुन्हा एकदा लष्करी हल्ले करेल असं ट्रम्प यांनी म्हटले आहे. बुधवारी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, पुढील दोन किंवा तीन दिवसांत विशेषतः शुक्रवार, शनिवार किंवा रविवार या दिवशी, अथवा पुढील आठवड्याच्या सुरुवातीला इराणवर आणखी एक मोठा लष्करी हल्ला करू शकतात. मात्र, तज्ज्ञांनी ट्रम्प यांचे हे विधान केवळ "पोकळ बडबड" असल्याचे म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com