
इराण-इस्रायल यांच्यात युद्ध सुरू असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, इराणला तडजोड करायची आहे. दरम्यान, अमेरिकेकडूनही इराणवर हल्ल्याची तयारी केली जात असल्याचं म्हटलं जात आहे.ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावावर चिंता व्यक्त केलीय. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचा प्लॅन असून काहीही होऊ शकतं असं ट्रम्प यांनी म्हटलंय. एकीकडे ट्रम्प युद्धात उडी मारण्याच्या तयारीत असताना पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी ट्रम्पना शांततेचं नोबल देण्याची मागणी केलीय.