

US President Donald Trump speaks about the Iran conflict while Iran’s Revolutionary Guard rejects his claim that the war is ending.
esakal
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. इराणविरुद्ध सध्या सुरू असलेले युद्ध आता "जवळपास पूर्णपणे" संपुष्टात आले आहे, अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा या संघर्षामुळे केवळ पश्चिम आशियामध्येच नव्हे, तर संपूर्ण जगभरातच मोठी खळबळ उडाली आहे. ऊर्जा पुरवठ्याबाबतचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले आहे. तथापि, इराणने ट्रम्प यांचे हे दावे पुन्हा एकदा फेटाळून लावले आहेत. हे युद्ध कधी संपवायचे, हे अमेरिका नव्हे, तर इराणच ठरवेल, असे इराणने ठामपणे नमूद केले आहे.